Rohit Sharma Injury Update News sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma Injury : पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून रोहित शर्मा बाहेर? कर्णधाराच्या दुखापतीमुळे टीम इंडिया टेन्शनमध्ये

Rohit Sharma Injury Update News : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या पहिल्या सामन्यात विजयाने सुरुवात केली.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या पहिल्या सामन्यात विजयाने सुरुवात केली. न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. भारतीय संघाने आयर्लंडला अवघ्या 96 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर हे लक्ष्य 13 षटकांतच गाठले.

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या बॅटमधून 52 धावांची उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली पण फलंदाजी करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो डावाच्या मध्यभागी निवृत्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे रोहित पाकिस्तानविरुद्ध खेळू शकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्णधार रोहित शर्मा अचानक मैदानाबाहेर गेल्यामुळे टीम इंडिया टेन्शनमध्ये दिसत आहे. खरं तर, दहाव्या षटकात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रोहितला दुखापत झाली. वेगवान गोलंदाज जोश लिटलचा शॉर्ट पिच बॉल रोहितच्या उजव्या खांद्यावर जोरात लागला. यानंतर फिजिओ मैदानात आल्यानंतर त्याने पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला

रोहित पाकिस्तानविरुद्ध खेळू शकेल का?

पण रोहित पाकिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळू शकणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पण या सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर रोहितने त्याच्या दुखापतीबद्दल सांगितले की, त्याची दुखापत फारशी गंभीर नाही, ही दुखापत थोडी आहे त्यामुळे त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपला पुढचा सामना ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे, त्याआधी कर्णधार रोहितचे हे विधान सर्व चाहत्यांसाठी निश्चितच दिलासादायक मानले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT