Rohit Sharma Fitness Update sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup : पाकविरुद्धच्या मॅचपूर्वी वाढले टेन्शन! कर्णधार रोहितला पुन्हा झाली दुखापत, आता कुठे लागला बॉल?

Rohit Sharma Fitness Update For IND vs PAK Match T20 World Cup 2024 : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चा रोमांचक टप्पा सुरू झाला आहे. सुपर 8 चे गणित प्रत्येक सामन्यानंतर बदलत आहे.

Kiran Mahanavar

Ind vs Pak T20 World Cup 2024 Rohit Sharma Update : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चा रोमांचक टप्पा सुरू झाला आहे. सुपर 8 चे गणित प्रत्येक सामन्यानंतर बदलत आहे. भारतीय संघाने या वर्ल्ड कपमधील पहिला सामना आयर्लंडविरुद्ध जिंकला. आता भारतीय संघाचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. जो 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

मात्र, त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसबाबत भारतीय चाहत्यांच्या मनात शंका आहे. रोहित शर्मा पूर्णपणे फिट आहे की नाही, हा प्रश्न सध्या प्रत्येक चाहत्याच्या मनात घोळत आहे.

रोहितच्या फिटनेसबाबत काय आहे अपडेट?

खरं तर, जेव्हा भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला तेव्हा सामन्यादरम्यान रोहित शर्मा दुखापतीचा बळी ठरला होता. त्यामुळे अर्धशतकी खेळी खेळल्यानंतर तो निवृत्त झाला आणि मैदानाबाहेर गेला.

आता भारतीय संघाला पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही हे प्रत्येक चाहत्याला जाणून घ्यायचे असते. कारण एवढ्या मोठ्या सामन्यात रोहित शर्मासारख्या दिग्गज फलंदाजाला पूर्णपणे तंदुरुस्त राहणे खूप महत्त्वाचे ठरते.

रोहितच्या अंगठ्याला झाली दुखापत

रोहित शर्माच्या अंगठ्याला आता दुखापत झाली आहे. भारतीय कर्णधाराला नेटमध्ये ही दुखापत झाली. तो नेटमध्ये श्रीलंकेच्या थ्रोडाउन स्पेशालिस्ट नुवानविरुद्ध सराव करत असताना चेंडू त्याच्या हाताला लागला. त्यावेळी रोहित वेदनेत दिसला. यानंतर फिजिओने लगेच येऊन तपासणी केली पण नंतर नेटच्या बाहेर गेला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे आणि म्हणूनच त्यांच्या मोठ्या खेळाडूंनी कामगिरी करणे आवश्यक आहे. रोहित शर्माने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती आणि तो फॉर्मात असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचे पूर्णपणे तंदुरुस्त असणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT