Rohit Sharma Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma: 'हे खुल्या मैदानासारखं...' भारत-पाकिस्तान सामना होणाऱ्या न्युयॉर्कच्या नव्या स्टेडियमबद्दल रोहित काय म्हणाला?

Cricket Stadium in New York: भारतीय संघ न्युयॉर्कमधील नव्या स्टेडियमवर टी20 वर्ल्ड कपमधील तीन सामने खेळणार आहे, त्याबद्दल रोहित शर्माने भाष्य केले आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे 1 ते 29 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील काही सामने अमेरिकेतली तीन स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.

यातील न्युयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिल्यांदाच सामने खेळवण्यात येणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या या स्टेडियमवर भारतीय संघ पहिल्याच फेरीत सामने खेळणार आहे.

भारतीय संघ पहिल्या फेरीतील पहिले तीन सामने या मैदानावर खेळणार आहे. आता या स्टेडियमच्या पहिल्या अनुभवाबाबत भारताचा कर्णधार रोहित शर्माने भाष्य केले आहे. रोहित या स्टेडियमला पाहून प्रभावित झाला आहे, त्याने स्टेडियमचे कौतुक देखील केले आहे.

तो म्हणाला, 'हे खूपच सुंदर दिसत आहे. काहीसे खुल्या मैदानासारखे आहे. जेव्हा आम्ही इथे येऊ आणि पहिला सामना खेळू, तेव्हा असणाऱ्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे.'

'या मैदानाची प्रेक्षक क्षमताही चांगली आहे. न्युयॉर्कमधील लोकही वर्ल्ड कप पाहण्यासाठी उत्सुक वाटत आहेत. कारण वर्ल्ड कप पहिल्यांदाच इथे होत आहे.'

'मला खात्री आहे वेगवेगळ्या संघांचे चाहते या स्पर्धेसाठी उत्सुक असतील आणि खेळाडूही सामने खेळण्याच्या प्रतिक्षेत असतील.'

या नव्या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 34,000 हजार आहे. न्युयॉर्कमधील या नव्या स्टेडियमवर सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना 3 जून रोजी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघात होणार आहे. पण त्याआधी भारत आणि बांगलादेश संघात याच मैदानात 1 जून रोजी सराव सामना होणार आहे.

तसेच भारतीय संघ या मैदानात टी20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी याच मैदानात बहुप्रतिक्षित पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामना होणार आहे.

तसेच याच मैदानात भारताचा तिसरा सामना अमेरिकेविरुद्ध 12 जून रोजी सामना होणार आहे. यानंतर पहिल्या फेरीतील भारताचा शेवटचा सामना 15 जून रोजी शनिवारी कॅनडा विरुद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT