Virat-Rohit-Batting 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs AFG: रोहित-विराटचा एकत्र बॅटिंगचा सराव, पाहा Video

भारताची आज अफगाणिस्तान विरूद्ध प्रतिष्ठा पणाला | Must Win for Team India

विराज भागवत

भारताची आज अफगाणिस्तान विरूद्ध प्रतिष्ठा पणाला | Must Win for Team India

IND vs AFG, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा आज अफगाणिस्ताशी सामना रंगणार आहे. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. त्यामुळे भारताला अद्यापही गुणांचं खातं उघडता आलेलं नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंडने भारताला पराभूत केल्यानंतर आज भारतासाठी अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. म्हणून या सामन्यासाठी भारताचे दोन तगडे फलंदाज एकत्र फलंदाजीचा सराव करताना दिसले.

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे संघाचे दोन आधारस्तंभ आहेत. पण गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित आणि विराट यांना आपल्या लौकिलाला साजेसा खेळ करण्यात अपयश येत आहे. रोहितने सराव सामन्यात अर्धशतक ठोकलं होतं तर विराटने पाकिस्तानविरूद्ध अर्धशतक झळकावलं होतं. पण असं असलं तरी त्यांच्या या खेळीचा भारताला टी२० स्पर्धेत काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे सामन्याच्या पूर्वसंध्येला हे दोघेही कसून सराव करताना दिसून आले. BCCI ने स्वत: याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

विराट-रोहितचा एकत्र सराव...

टी२० क्रिकेटमध्ये IND vs AFG

भारत आणि अफगाणिस्तान या दोन संघांनी एकमेकांविरूद्ध केवळ दोन टी२० सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने टी२० वर्ल्ड कप दरम्यान खेळवण्यात आले आहेत. पहिला सामना २०१०च्या टी२० वर्ल्ड कप दरम्यान खेळण्यात आला होता. त्यात भारत सात गडी राखून जिंकला होता. दुसरा सामना २०१२च्या वर्ल्ड कपमध्ये रंगला होता. त्यावेळीही भारताचे सामना २३ धावा राखून जिंकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT