Sanjana Ganesan treat for Jasprit Bumrah Instagram
क्रिकेट वर्ल्ड कप

Jasprit Bumrah: टी20 वर्ल्ड कप विजयानंतर पत्नीकडून बुमराहला मिळाली खास ट्रीट, पाहा Video

Jasprit Bumrah-Sanjana Ganesanभारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर मालिकावीर ठरलेल्या जसप्रीत बुमराहला पत्नी संजना गणेशनकडून खास ट्रीट मिळाली होती.

सकाळ डिजिटल टीम

Sanjana Ganesan treat for Jasprit Bumrah: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीतील पराभवाच्या जखमा गेल्या आठवड्यात भरून निघाला जेव्हा टीम इंडियाने 2024 च्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला.

गेल्या आठवड्यात बार्बाडोसमध्ये टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, स्पर्धेदरम्यान जसप्रीत बुमराहची त्याची पत्नी संजना गणेशनने मैदानावर त्याची मुलाखत घेतली होती.

ही मुलाखत घेतल्यानंतर बुमराहला संजनाने विचारले होते की डिनरसाठी काय आहे? आता संजनानेच तिच्या विश्वविजेत्या पतीला खास ट्रीट दिली आहे. संजना या स्पर्धेसाठी ब्रॉडकास्टींग टीमचा भाग होती.

भारताच्या टी२० वर्ल्ड कप विजयानंतर संजनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये असे दिसून आले की संजनाने विजय साजरा करण्यासाठी बुमराहला आईस्क्रीम डेटवर नेले होते.

व्हिडिओमध्ये, बुमराह खूप आनंदी दिसत आहे, तो विजयाचे चिन्ह दाखवताना दिसत आहे तर संजना त्याच्याकडे बघून हसत होती. संजनाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सकाळी आईस्क्रीमसाठी या वर्ल्ड चॅम्पियनला घेऊन गेले.'

ही भावना खूप खास आहे

फायनलनंतर पत्नी संजनाला दिलेल्या मुलाखतीत जसप्रीत बुमराहने सांगितले 'ही भावना खास आहे, मी बाकी वेळेस माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, कामावरती लक्ष देतो, पण आज माझ्याकडे जास्त शब्द नाहीत.'

'मी सहसा खेळानंतर रडत नाही. पण हे खरंच खास आहे. सामन्याच्या मधल्या टप्प्यात आम्हाला वाटले की परिस्थिती कठीण आहे, परंतु अशा प्रकारे जिंकणे ही एक अविश्वसनीय भावना आहे.'

माझे कुटुंब माझ्यासोबत आहे

तो पुढे म्हणाले, 'माझा मुलगा येथे आहे, माझे कुटुंब येथे आहे आणि मी त्यांच्यासमोर भारतासाठी काहीतरी विशेष करत आहे, यापेक्षा चांगले काय असू शकते. आम्ही यासाठी खूप मेहनत घेत आहोत आणि गेल्या वेळी आम्ही खूप जवळ आलो, पण थोडे कमी पडलो. या दिवसासाठी खेळतो व आम्ही जिंकलो यापेक्षा चांगली भावना नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT