Virat Kohli T20 World Cup 2024  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Sanjay Manjrekar Vs Virat Kohli : संजय मांजरेकर विराट कोहलीबद्दल हे काय बोलून गेले?

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli T20 World Cup 2024 : विराट कोहली हा भारतीय संघातील चिंतेचा विषय आहे असे आपण कधी ऐकलं नव्हतं. मात्र यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात विराट कोहलीची बॅटिंग स्टाईल हा चिंतेचा विषय म्हणून पाहिला जात आहे.

भारताचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांना भारताच्या टी 20 वर्ल्डकप ट्रॉफी जिंकण्याच्या वाटेत विराट आडवा येत असल्याचं जाणवत आहे. विराट कोहलीने टी 20 वर्ल्डकपमध्ये दोनवेळा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळवला आहे. नुकतेच त्यानं आयपीएलमध्ये मोठा धमाका करत 741 धावा केल्या आहेत. मात्र तरी देखील तो चिंतेचा विषय आहे.

विराट खरंच टी20 ट्रॉफीच्या आडवा येतोय?

संजय मांजरेकर यांना विराट कोहलीसारखा तीनही फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा फलंदाज चिंतेचा विषय का वाटतोय?

संजय मांजरेकरांनी याबाबत स्टार स्पोर्ट्सशी बोलातना स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, 'सेमी फायनल आणि फायनल सारख्या मोठ्या सामन्यात एकच चिंता आहे विराट कोहली! विराट कोहली मोठ्या सामन्यात सर्व जबाबदारी स्वतःवर घेतो. तुम्हाला सर्व मोठ्या सामन्यात हे जाणवलं असेल. अशा सामन्यात विराटला स्वतः खूप वेळ फलंदाजी करावी असं वाटत असतं.

'त्याची इंडियन क्रिकेटमध्ये तशी प्रतिमा असल्यानं तो ती आपलीच जबाबदारी आहे असं समजून खेळतो. त्यानं खूप वेळ टिकून फलंदाजी करण्यापेक्षा मुक्तपणे बॅटिंग करणं गरजेचं आहे. त्यानं त्याच्या प्रतिमेची चिंता करू नये. आपण वनडे वर्ल्डकपमध्ये ते पाहिलं आहे. त्यामुळं सेमी फायनल आणि फायनलमध्ये माझ्या दृष्टीने विराट कोहली हा चिंतेचा विषय आहे.'

टी 20 क्रिकेटमध्ये अँकर इनिंगचे दिवस संपले

मांजरेकर यांनी टी 20 क्रिकेटमधील अँकर इनिंगबाबत देखील आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, 'टी 20 क्रिकेटमध्ये आता अँकर रोल असा काही प्रकार उरलेला नाही. तुम्ही प्रथम फलंदाजी करत असाल तर अँकर इनिंगचा संबंधच येत नाही. जर तुम्ही दोन चार विकेट्स गेल्यात म्हणून गोलंदाजाला आदर द्यायला गेला तर तुम्ही दोन तीन षटके वाया घालवता. हे मोठं नुकसान करणारं ठरू शकतं.'

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT