Shaheen Afridi India Vs Pakistan  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Shaheen Afridi : चांगली गोलंदाजी करायची नाही... भारतीय चाहत्यांची प्रेमळ विनंती, आफ्रिदीने लावला डोक्याला हात

T20 World Cup 2024 : शाहीन आफ्रिदी भारतीय चाहत्यांना सेल्फी देऊन चांगलाच फसला.

अनिरुद्ध संकपाळ

Shaheen Afridi India Vs Pakistan : टी 20 वर्ल्डकप 2024 मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना आज 9 जून रोजी न्यूझीलंडच्या नासाऊ स्टेडियमवर होत आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडणार आहेत. या दोन्ही संघांना अमेरिकेत चांगला पाठिंबा मिळतो. त्यामुळे सामन्यावेळी स्टेडियम पूर्ण भरलेले असण्याची शक्यता आहे.

भारताने आयर्लंडचा पराभव करत टी 20 वर्ल्डकपमध्ये विजयी सुरूवात केली. तर पाकिस्तानची सुरूवात मात्र खराब झाली. युएसएने त्यांना सुपर ओव्हरमध्ये मात दिली. भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतील तर पाकिस्तानचा संघ युएसएविरूद्धचा पराभव विसरून पुनरागमन करण्यासाठी जोर लावतील.

दरम्यान, पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी न्यूयॉर्कमध्ये फिरत असताना काही भारतीय चाहत्यांना भेटला. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी शाहीन आफ्रिदीची चांगलीच मजा घेतली. सोशल मीडियावर सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारतीय चाहचे शाहीन आफ्रिदीला म्हणाले की, उद्या चांगली गोलंदाजी करायची नाहीये. रोहित आणि विराटला आपला चांगला दोस्त समज.

यावर शाहीन फार काही बोलला नाही मात्र त्यानं आपल्या डोक्याला हात लावला. शाहीन आफ्रिदीने 2021 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भन्नाट गोलंदाजी करत रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलची शिकार केली होती. तो सामना भारतीय संघाने 10 विकेट्सनी गमावला होता. पाकिस्तानचा हा वर्ल्डकपमध्ये भारातवरचा एकमेव विजय ठरला.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, मला सामना जिंकण्यासाठी एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून रहायचं नाहीये. मला वाटतं की 11 खेळाडूंनी योगदान देणं महत्वाचं आहे. काही महत्वाचे खेळाडू आहेत ते महत्वाची भुमिका निभावतील. मात्र संघातील प्रत्येकानं आता योगदान देणं गरजेचं आहे.'

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १२ सप्टेंबर २०२६ ते १८ सप्टेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

SCROLL FOR NEXT