Shahid Afridi Vs Babar Azam esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Shahid Afridi : बाबर आझमने वातावरण बिघडवलं? शाहीनच्या सासऱ्यानं भारत-पाक सामन्यापूर्वीच केला मोठा स्फोट

अनिरुद्ध संकपाळ

Shahid Afridi Vs Babar Azam : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. टी 20 वर्ल्डकप 2024 मधील ही सर्वात हाय व्होल्टेज मॅच आहे. भारताने आयर्लंडला मात देत स्पर्धेची विजयी सुरूवात केली आहे. मात्र पाकिस्तानला युएसएने पराभवचा धक्का दिला. त्यामुळं भारताविरूद्दच्या सामन्यात पाकिस्तानवर प्रचंड दबाव असणार आहे. त्यातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सध्याचा कर्णधार बाबर आझमवर जहरी टीका केली आहे.

टी 20 वर्ल्डकपपूर्वी पीसीबीमध्ये सत्तांतर झालं. त्यानंतर बाबर आझम पुन्हा एकदा संघाचा कर्णधार झाला आहे. बाबरच्या आधी शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या टी 20 संघाचा कर्णधार होता. मात्र त्याला एकाच मालिकेतनंतर डच्चू देऊन पुन्हा बाबर आझमला कर्णधार करण्यात आलं.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी समा टीव्हीशी बोलताना म्हणाला की, 'खूप काही गोष्टी असतात. इथं मोहम्मद वसीम आहे. त्यानं निवडसमिती सदस्य म्हणून खूप चांगलं काम केलं आहे. त्याला देखील अनेक गोष्टी माहिती आहेत. मला देखील अनेक गोष्टी माहिती आहेत. सोहेलला देखील काही गोष्टी माहिती असतील. मात्र या गोष्टी सार्वजनिकरित्या बोलल्या जात नाहीत.'

शाहिद आफ्रिदी पुढे म्हणाला की, 'माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे सर्व गोष्टींची जबाबदारी कर्णधाराची असते. मी देखील कॅप्टन होतो. सर्वात महत्वाचा लीडरच असतो. तो तुम्हाला सर्वांना एकत्र घेऊन जात असतो. कॅप्टन संघातील वातावरण खराब करतो किंवा तो चांगला संघ तयार करतो. कोच नंतर येतात मात्र मुख्य काम हे कर्णधाराचेच असते.'

शाहिद म्हणाला की, 'मी त्या गोष्टीत जात नाही. कारण शाहीनसोबत माझं नातं आहे. जर मी काही म्हणालो तर तू तुझ्या जावयाला फेव्हर करतोयस असं लोकं म्हणतील. मात्र माझ्यासाठी जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. गेल्या काही दिवसात आपल्यातील मोठ्या व्यक्तींनी, बोर्डाने सिलेक्शन कमिटीने अनेक मोठ्या चुका केल्या आहेत. वर्ल्डकप झाल्यानंतर मी यावर अधिक बोलणार आहे. आपण संघाला आपण खराब करून टाकलं आहे.'

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

Xi Jinping दिल्लीत दाखल; सोबत काय आणले? 15 हजार पोलीस, ‘भयानक’ ताफा अन् खास कार-विमान

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Jharkhand Health : कॅन्सर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयांत ‘डे-केअर सेंटर’, आयुष्मान कार्डधारकांना पॅकेज दरात उपचार

SCROLL FOR NEXT