Shardul Thakur Undergoes Foot Surgery In London sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 दरम्यान टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर शस्त्रक्रिया, इतके महिने क्रिकेटपासून दूर

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित करण्यात येणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये खेळत आहे.

Kiran Mahanavar

Indian Cricket Team : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित करण्यात येणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये खेळत आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या एका स्टार ऑलराऊंडरशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर या स्टार खेळाडूवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. यामुळे हा खेळाडू आता पुढील काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून शार्दुल ठाकूर आहे.

अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तो किमान तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. सोशल माध्यमावर स्वत: शार्दुल याने पायाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली.

शार्दुल ठाकूर याला याआधी २०१९मध्येही पायाच्याच दुखापतीचा सामना करावा लागला होता. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला दुखापत झाली होती; पण तरीही तो मुंबईसाठी रणजी स्पर्धेत खेळला.

मुंबईने ४२व्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. आयपीएलच्या नुकत्याच पार पडलेल्या मोसमातही त्याला चमक दाखवता आली नाही. आता भारतातील स्थानिक मोसम सुरू होण्याआधी तो तंदुरुस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT