Sourav Ganguly Comment On Rohit Sharma esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Sourav Ganguly : तो तयारच नव्हता.. आम्ही दबाव टाकला! सौरवनं सांगितलं टीम इंडियाला कसा मिळाला कॅप्टन रोहित

T20 World Cup 2024 Final : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सात महिन्यात दोन वर्ल्डकपच्या फायनल खेळत आहे. सौरव गांगुलीने याबाबत आपलं मत व्यक्त केलं.

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly Comment On Rohit Sharma : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने रोहित शर्माच्या नेतृत्व गुणांचे तोंडभरून कौतुक केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चार आयसीसी स्पर्धेत तीनवेळा फायनल गाठली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल, वनडे वर्ल्डकपची फायनल आणि टी 20 वर्ल्डकपची फायनल खेळली आहे. जवळपास सहा महिन्याच्या अंतरात भारत वनडे वर्ल्डकपनंतर आता टी 20 वर्ल्डकपची देखील फायनल खेळत आहे. दोन्ही स्पर्धेत भारत फायनलपर्यंत अपराजीत राहून पोहचला आहे.

याबाबत बोलताना बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, 'रोहित आता दोन वर्ल्डकप फायनल खेळणार आहे. तिथंपर्यंत संघ न हरता पोहचला आहे. यावरूनच त्याची कॅप्टन्सी त्याचे नेतृत्व गुण कसे आहेत हे समजून येतं. मला याचं आश्चर्य वाटत नाही. कारण ज्यावेळी तो टीम इंडियाचा कर्णधार झाला त्यावेळी मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. विराट कोहली टीम इंडियाची कॅप्टन्सी करू इच्छित नव्हता.

गांगुली पुढे म्हणला की, 'त्याला कर्णधार करण्यासाठी खूप वेळ लागला. तो कॅप्टन्सी घेण्यास तयारच नव्हता. आम्ही सर्वांनी खूप दबाव आणला आणि त्याला कर्णधार केलं. मी त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने केलेली प्रगती पाहून खूप खूश आहे.'

'रोहितने विक्रमी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलं आहे. ही खूप मोठी कामगिरी आहे. आयपीएलचे विजेतेपद पटकावणं कधी कधी कठिण असतं. माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका मी आयपीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा चांगलं आहे असं मी म्हणत नाहीये. मात्र तुम्हाला आयपीएल जिंकण्यासाठी 16 ते 17 सामने जिंकावे लागतात.'

गांगुलीने रोहित वर्ल्डकप जिंकणं काय असतं हे देखील सांगितलं तो म्हणला 'इथं तुम्हाला वर्ल्डकप जिंकण्यासाठी 8 ते 9 सामने जिंकावे लागतात. वर्ल्डकप जिंकण्यात मास्त मान मरातब असतं मला आशा आहे रोहित उद्या तो मान पटकावेल. मला नाही वाटत तो सहा सात महिन्यात दोन वर्ल्डकप फायलन हरेल. त्याच्या नेतृत्वाखाली दोन वर्ल्डकप फायनल हरल्या तर तो बार्बाडोसच्या समुद्रात उडी मारले.'

'त्याने पुढं होऊन संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याने दमदार फलंदाजी केली आहे. मला आशा आहे की तो उद्या देखील अशीच कामगिरी करेल. आशा आहे की भारतीय संघ जिंकेल. त्यांनी मुक्तपणे खेळलं पाहिजे. ते स्पर्धेतील सर्वात चांगली टीम आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. आशा करूयात की नशीब त्यांच्या बाजूने असावं कारण अशा मोठ्या स्पर्धांमध्ये त्याची नक्कीच गरज असते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT