South Africa Vs Nepal T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

RSA vs NEP T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेची लाज एका धावेने वाचली; नेपाळविरूद्धच्या सामन्यात झाले खंडीभर विक्रम

T20 World Cup 2024 : एका धावेने सामना जिंकण्यात दक्षिण आफ्रिकेची आहे मक्तेदारी, नेपाळविरूद्धच्या सामन्यात झाले मोठे रेकॉर्ड्स

अनिरुद्ध संकपाळ

RSA vs NEP T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकपम 2024 मध्ये आज (दि. 15) मोठा उलटफेर होता होता राहिला. नेपाळने दक्षिण आफ्रिकेचा जवळपास पराभव केला होता. मात्र शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेने चांगला मारा करत अवघ्या 1 धावेने विजय मिळवला.

नेपाळने दक्षिण आफ्रिकेला 115 धावात रोखलं होतं. त्यानंतर नेपाळने 14 षटकात 2 बाद 85 धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यानंतर त्यांची घसरण झाली अन् त्यांनी अवघ्या 5 धावात 4 विकेट्स गमावल्या. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज असताना गुलशन धावबाद झाला अन् आफ्रिकेने निसटता विजय मिळवला. आजच्या सामन्यात टी 20 वर्ल्डकप आणि टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बरेच विक्रम देखील झाले आहेत.

टी 20 वर्ल्डकपमध्ये एका धावेने विजय मिळवणारे संघ

  • 2009 - दक्षिण आफ्रिका विरूद्ध न्यूझीलंड, लॉर्ड्स

  • 2010 - न्यूझीलंड विरूद्ध पाकिस्तान, ब्रिजटाऊन

  • 2012 - भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, कोलंबो

  • 2016 - भारत विरूद्ध बांगलादेश, बंगळुरू

  • 2022 - झिम्बाब्वे विरूद्ध पाकिस्तान, पर्थ

  • 2024 - दक्षिण आफ्रिका विरूद्ध नेपाळ, किंग्जटाऊन

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 1 धावेने विजय मिळवणारे संघ

  • दक्षिण आफ्रिका - 5

  • इंग्लंड - 2

  • न्यूझीलंड - 2

  • भारत - 2

  • आयर्लंड - 2

  • केनिया - 2

टी 20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेने डिफेंड केलेले सर्वात कमी धावांचे टार्गेट

  • 2024 - बांगलादेशविरूद्ध 114 धावा

  • 2013 - श्रीलंकेविरूद्ध 116 धावा

  • 2024 - नेपाळविरूद्ध 116 धावा

  • 2010 - वेस्ट इंडीज विरूद्ध 121 धावा

  • 2009 - न्यूझीलंडविरूद्ध 129 धावा

टी 20 वर्ल्डकपमध्ये डिफेंड केलेले सर्वात कमी धावांचे टार्गेट

  • 2024 - दक्षिण आफ्रिका विरूद्ध बांगलादेश, 114 धावा

  • 2024 - दक्षिण आफ्रिका विरूद्ध नेपाळ, 116 धावा

  • 2014 - श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड, 120 धावा

  • 2024 - भारत विरूद्ध पाकिस्तान, 120 धावा

  • 2016 - अफगाणिस्तान विरूद्ध वेस्ट इंडीज, 124 धावा

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग 7व्या दिवशी सोन्याचा भाव घसरला! सोनं तब्बल 7,200 रुपयांनी स्वस्त! आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील इतके रुपये

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा फोन, काळे झेंडे अन् घोषणाबाजी; तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परभणीचा मेळावा घेतला

LPG Rules September 2026 : एलपीजी ग्राहकांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरचे ‘हे’ ५ नियम बदलणार

Hirakani Tigress Latest Update : सह्याद्रीच्या जंगलात 'हिरकणी'चा मुक्त वावर! चिपळूणच्या डोंगरात 2 महिने मुक्काम; वन विभागाचे जीपीएसवर लक्ष

Nepal Flood Rescue: मृत्यू दिसत होता; तरी धैर्य सोडले नाही!; नेपाळमधील मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतलेल्या भाविकांचे थरारक अनुभव

SCROLL FOR NEXT