SA vs AFG T20 WC24 : अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत पत्करली शरणागती! 56 धावांत खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा डंका  
क्रिकेट वर्ल्ड कप

SA vs AFG T20 WC24 : अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत पत्करली शरणागती! 56 धावांत खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा डंका

South Africa vs Afghanistan T20 World Cup 2024 Semi Final : आज त्रिनिदाद येथे दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळला जात आहे.

Kiran Mahanavar

South Africa vs Afghanistan T20 World Cup 2024 Semi Final : आज त्रिनिदाद येथे दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या फलंदाजीची सुरुवात खुपच खराब झाला. दक्षिण आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा संघ अवघ्या 56 धावांत गडगडला. अफगाणिस्तानच्या 10 खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून अतिशय धोकादायक गोलंदाजी पाहायला मिळाली. मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांनी 3-3 बळी घेतले. याशिवाय रबाडा आणि एनरिकने प्रत्येकी 2 बळी घेतले. आफ्रिकन गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासून विकेट्स घेण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 11.5 षटकांत गडगडला.

अफगाणिस्तानचा अनुभवी फलंदाज गुरबाजलाही या सामन्यात फारशी कामगिरी करता आली नाही. गुरबाज खाते न उघडताच बाद झाला. यानंतर गुलबदिन नायब 9 धावा करून बाद झाला. चौथ्या षटकात कागिसो रबाडाने अफगाणिस्तानला दोन मोठे धक्के दिले, पहिला इब्राहिम झद्रान आणि नंतर मोहम्मद नबी बाद झाला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानचा एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही. अफगाणिस्तानने 10 षटकांत 50 धावांत 8 विकेट गमावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT