Sri Lanka vs Nepal Match abandoned due to rain sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Sri Lanka T20 World Cup : अवकाळी पावसाचा चॅम्पियन संघाला बसला तडाखा! स्वप्नांवर फिरलं पाणी; टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर

Sri Lanka vs Nepal Match abandoned due to rain : वर्ल्ड कपचा 23 वा सामना नेपाळ आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार होता. पण फ्लोरिडातील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर दोघांमधील हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

Kiran Mahanavar

Sri Lanka vs Nepal T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये चॅम्पियन्स श्रीलंकेच्या संघाला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. वर्ल्ड कपचा 23 वा सामना नेपाळ आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार होता. पण फ्लोरिडातील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर दोघांमधील हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमावलेल्या श्रीलंकेच्या संघाला नेपाळविरुद्ध विजयाची नितांत गरज होती. पण पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे चॅम्पियन्स संघ टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. आता त्याचे सुपर-8 चे भवितव्य जर-तर या समीकरणात अडकले आहे. हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. या रद्द झालेल्या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिका सुपर-8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

श्रीलंकेचा संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप D मध्ये आहे. या गटात श्रीलंकेसह दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळचे संघ आहेत. श्रीलंकेचा संघ यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला होता. आता नेपाळबरोबर गुण शेअर केल्यानंतर ते पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड प्रत्येकी एक सामना जिंकून पहिल्या तीन स्थानावर आहेत.

नेपाळचा संघ हा गटातील सर्वात नवीन आणि कमी अनुभवी संघ आहे. नेपाळला हरवून दोन गुण मिळवता येतील, अशी आशा श्रीलंकेला नक्कीच असेल. पण पावसाने त्याची इच्छा धुळीस मिळवली. दुसरीकडे, गटात नेपाळचे खाते उघडले असून गुणतालिकेत ते श्रीलंकेच्या वर आहे.

श्रीलंकेला आता बांगलादेश आणि नेदरलँड्सविरुद्ध अधिक खेळायचे आहे. सुपर-8 गाठायचे असेल तर हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. यापैकी एकही सामना तो हरला तर तो बाहेर जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT