Sunil Gavaskar | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup Final: ऋषभ पंतच्या चतुराईचा झाला फायदा अन् क्लासेनची गेली विकेट, गावसकरांनी सांगितलं कोणता क्षण ठरला महत्त्वाचा

Rishabh Pant: टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऋषभ पंतच्या डावपेचांही भारताला फायदा झाल्याचं गावसकरांनी सांगितलं असून त्यांनी यासाठी उदाहरणही दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sunil Gavaskar on Rishabh Pant: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या अंतिम सामन्यात सात धावांनी हरवले. ह्या सामन्यात विराट कोहली आणि अक्षर पटेल आणि शिवम दुबेची फलंदाजी, तसेच हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांची गोलंदाजी तर सूर्यकुमार यादवचा कॅच हे सर्व उल्लेखनीय ठरले.

परंतु यासर्वांमध्ये भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ऋषभ पंतचे डावपेचही अधोरेखित केले, जे महत्त्वाचे ठरले. त्यांनी सांगितले की, याचे उदाहरण देखील ते दिले.

सुनील गावसकर यांनी स्पोर्टस् टुडेला सांगताना म्हटले, "मला तुमचे लक्ष वेगळ्या गोष्टीकडे वेधायचे आहे, जे खूप महत्त्वाचे आहे. काहीवेळा लहान डावपेच काम करतात आणि सामन्याचा निकाल बदलू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा दोन गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना, फलंदाजांना त्यांची लय तोडण्यासाठी थोडा वेळ लागतो.

ऋषभ पंतने २०२४ च्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये असेच केले होते, जेव्हा हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर चांगली फलंदाजी करत होते त्यावेळी त्यानी फिजिओला बोलावून उपचार घेतले होते."

गावसकर पुढे म्हणाले, "ऋषभ पंतला फिजिओने गुडघ्यावर एक पट्टा लावला आणि या दरम्यान खेळ सुमारे ४-५ मिनिटे थांबला. याचा फायदा असा झाला की क्लासेनची लय तुटली आणि कर्णधार व गोलंदाजाला थोडा वेळ मिळाला.'

'क्लासेन आणि मिलरची लय तुटताच क्लासेन पुढच्याच चेंडूवर बाद झाला. मागील षटकात बुमराहने केवळ चार धावा दिल्या होत्या. क्लासेन आणि मिलरवर थोडंसं दडपण होतं, त्यामुळे त्यांनी बाहेरचा चेंडू मारला आणि तिथेच हार्दिक पंड्याचा चेंडू क्लासेनसाठी काळ ठरला त्यानंतर भारताला महत्त्वाचं यश मिळालं."

या सामन्यात भारताने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून क्लासेनने ५२ धावांची खेळी केली होती. तसेच मिलरने २१ धावांची खेळी केली होती. पण त्यांन संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. दक्षिण आफ्रिका संघाने २० षटकात ८ बाद १६८ धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT