T20 world Champions Team India Arrives Home sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

स्वागत नहीं करोगे... ढोलताशाच्या तालावर सूर्या अन् पांड्याने धरला ठेका; पोलीस बघतच राहिले... Video Viral

T20 world Champions Team India Arrives Home : आज दिल्ली ते मुंबई जल्लोष होणार आहे. कारण टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीसह टीम इंडिया मायदेशी परतली आहे.

Kiran Mahanavar

T20 world Champions Team India Arrives Home : आज दिल्ली ते मुंबई जल्लोष होणार आहे. कारण टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीसह टीम इंडिया मायदेशी परतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी सकाळी दिल्लीला पोहोचला. टीम इंडियाच्या खेळाडूंचे दिल्ली विमानतळापासून ते ITC मौर्य हॉटेलपर्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. रस्त्यावर चाहत्यांची गर्दी झाली होती. दिल्लीच्या भूमीवर खेळाडूंचे स्वागत भांगड्याने करण्यात आले.

टीम इंडियाचा स्टार कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी ढोलताशाच्या तालावर भांगडा केला, तेव्हा ते स्वतःला रोखू शकले नाहीत. सूर्यकुमार यादव यांचा फाडू डान्स पाहून सगळेच थक्क झाले. दिल्ली पोलीसही बघतच राहिले. या व्हिडिओमध्ये तो कसा मस्तीमध्ये मग्न होऊन नाचतोय हे दिसत आहे.

खरं तर, टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज सकाळी एका विशेष विमानाने आपल्या देशात परतला, चाहत्यांनी विमानतळावर खेळाडूंचे जोरदार स्वागत केले आणि या दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था होती.

गेल्या शनिवारी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत ट्रॉफी जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT