Indian women cricket team sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T-20 Womens Series : टी-२० विश्‍वकरंडक, आशियाई स्पर्धेची तयारी; भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिली टी-२० लढत

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये उद्यापासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई - भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये उद्यापासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. आगामी आशियाई करंडक व टी-२० विश्‍वकरंडक या दोन महत्त्वाच्या स्पर्धांची रंगीत तालीम म्हणून या मालिकेकडे बघितले जात आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. त्यानंतर एकमेव कसोटी सामनाही आपल्या नावावर केला. त्यामुळे साहजिकच टी-२० मालिकेतही वर्चस्व राखण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करताना दिसणार आहे.

भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने एकदिवसीय मालिकेत दोन शतके व एक अर्धशतक झळकावताना आपण दमदार फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. हरमनप्रीत हिनेही अखेरच्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले.

शेफाली वर्मा हिला एकदिवसीय मालिकेत सूर गवसला नाही; पण कसोटीत तिने खणखणीत द्विशतक झळकावले. जेमिमा रॉड्रिग्ज व रिचा घोषा या खेळाडूंकडूनही छान खेळी झालेल्या आहेत. एकूणच काय तर भारतीय संघातील अव्वल पाच फलंदाज फॉर्ममध्ये आहेत.

गोलंदाजही सरस

भारतीय संघाने गोलंदाजी विभागातही ठसा उमटवला आहे. रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी यांनी चमक दाखवली आहे. दीप्ती शर्मा हिने अष्टपैलू कामगिरी बजावताना भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. राधा यादव, आशा शोभना व श्रेयांका पाटील या गोलंदाजही प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत आहेत. भारतीय संघ फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही बाबींमध्ये सरस असल्यामुळे टी-२० मालिकेतही दक्षिण आफ्रिकन संघ दबावाखाली राहील, यात शंका नाही.

कर्णधारावर मदार

दक्षिण आफ्रिकन संघाची मदार कर्णधार लॉरा वॉलवॉर्ड्‌ट हिच्या एकटीच्या खेळावर अवलंबून आहे; पण संघातील इतर खेळाडूंनीही दबावाखाली खेळ उंचवायला हवा. मेरीझन कॅप, सून लूस, ॲनेक बॉच, ताझमिन ब्रिट्‌स यांनीही दमदार खेळ करायला हवा.

तीन सामन्यांची टी-२० मालिका

पहिला सामना - ५ जुलै

दुसरा सामना - ७ जुलै

तिसरा सामना - ९ जुलै

(तीनही सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

SCROLL FOR NEXT