Virat Kohli and Mahendra Singh Dhoni Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

खास कॅप्शनसह BCCI नं शेअर केला धोनी-विराटचा फोटो

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मेंटॉरच्या रुपात धोनी पुन्हा एकदा टीम इंडियाला मार्गदर्शनाचे धडे देताना दिसतोय.

सुशांत जाधव

इंग्लंडमध्ये 2019 मध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघापासून हळू-हळू दूर निघून गेलेला महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा भारतीय संघासोबत दिसत आहे. आश्चर्यकारक धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो पुन्हा टीम इंडियाच्या ताफ्यात एका मोठ्या मिशनची धूरा सांभाळताना दिसेल, असा विचार कोणीच केला नव्हता. पण टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मेंटॉरच्या रुपात धोनी पुन्हा एकदा टीम इंडियाला मार्गदर्शनाचे धडे देताना दिसतोय.

चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिल्यानंतर धोनी आता भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी सज्ज झालाय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सर्वोच्च कामगिरी केलीये यात कोणतीच शंका नाही. पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्याच्यावरील हा ठपका पुसून काढण्यासाठी धोनीची रणनिती कितपत फायदेशीर ठरणार हे चित्र पुढील महिन्याभरात स्पष्ट होईल.

तत्पूर्वी मैदानात पुन्हा एकदा विराट-धोनी या जोडगोळीची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. ज्यावेळी धोनीने टप्प्याटप्प्याने संघाचे नेतृत्व सोडले आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसला तेव्हापासून धोनी-विराट यांच्याविषयी चर्चा रंगायची. भारतीय संघ दोन कॅप्टनसह मैदानात उतरतो. हेच टीम इंडियाच्या यशामागचे गुपित आहे, असे बोलले जायचे.

खुद्द विराट कोहलीने फिल्डवर धोनीच माझा कॅप्टन असल्याचे बोलून दाखवून धोनीविषयी आदर भावना व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा मैदानात या दोघांच्या हळव्या संवादाची कहाणी सुरु झाली आहे. इंग्लंड विरुद्धच्या सराव सामन्यानंतर बीसीसीआयने विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांचा एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोला त्यांनी खास कॅप्शन दिले आहे. हलक्या अंतःकरणाने होणारे सुसंवाद असेच काहीसे असतात. अशा आशयाच्या ओळींसह धोनी आणि कोहलीचा फोटो शेअर केलाय. हा बोलका फोटो खूप काही गोष्टी सांगून जाणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

PM मोदींचा VIDEO अन् नड्डांची भेट, वांगचुक यांचं उपोषण मागे; पण CJPचे आंदोलन सुरूच, प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख! पंढरपूर तालुक्यातील ‘या’ ७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कर्जमुक्तीचे सातबारा, पंढरपूर बाजार समितीत कृषी महोत्सव

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT