Hazlewood de Kock  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Video : कमनशिबी क्विंटन डी कॉक; उलटी-सुलटी फटकेबाजी आली अंगलट

संघ अडचणीत असताना अनुभवी क्विंटन डी कॉकवर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. पण...

सुशांत जाधव

T20 World Cup 2021, Australia vs South Africa : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकात कर्णधार टेम्बा बवुमा माघारी फिरल्यानंतर संघाला क्विंटन डी कॉकडून दमदार खेळीची अपेक्षा होती. पण तो नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. हेजलवूडच्या गोलंदाजीवर उलटी-सुलटी फटकेबाजी करण्याच्या नादात त्याने आपली विकेट फेकली. दक्षिण आफ्रिका संघाने अवघ्या 16 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. संघ अडचणीत असताना अनुभवी क्विंटन डी कॉकवर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी होती.

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पाचव्या षटकात क्विंटन डी कॉकने उलटा-सुटला फटका मारण्याचा प्रयत्न केला. जोश हेजलवूडच्या पहिल्यांच चेंडूवर त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन पॅडल स्विप मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फसला. चेंडू बॅटला लावण्यात त्याला यश मिळाले. पण त्याला चेंडू ज्या दिशेला मारायचा होता त्यात तो अपयशी ठरला. चेंडू बॅटची कड घेऊन क्रिजमध्येच हवेत उडाला. आणि चेंडू स्टंपवर जाऊन आदळला. स्वत:ne वाचवण्याचा साधा प्रयत्नही क्विंटन डी कॉकने केला नाही. तो क्रिजबाहेर उभा राहून चेंडू स्टंपच्या दिशेने जाताना पाहतच राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

NDA Success Story: जिद्द, चिकाटी अन् कठोर प्रशिक्षणाचा विजय; पदकविजेत्या छात्रांनी उलगडला तीन वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT