ENG vs NZ 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

न्यूझीलंड संघानं दिमाखात गाठली फायनल

सुशांत जाधव

England vs New Zealand, 1st Semi-Final : फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी सुरु असलेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने बाजी मारलीये. इंग्लंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना न्यूझीलंडसमोर 167 धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडने 5 गडी राखून हे लक्ष्य पार करत फायनल गाठली. न्यूझीलंडनकडून डॅरेन मिशेलने नाबाद अर्धशतकी खेळी केली. याशिवाय त्याला ड्वेन क्वॉन्वे आणि जेम्स निशिम यांनी उत्तम साथ दिली. इंग्लंडकडून डेविड मलान 42 धावा करुन माघारी फिरल्यानंतर मोईन अलीने अर्धशतक पूर्ण केले. मोईन अलीने 37 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने निर्धारित 20 षटकात 4 बाद 166 धावा केल्या होत्या.

डॅरेल मिशेलच्या नाबाद अर्धशतकीच्या जोरावर न्यूझीलंडचा 5 विकेट्स राखून धमाकेदार विजय

147-5 : 11 चेंडूत 27 धावांची मॅच विनिंग खेळी करुन जेम्स निशम माघारी

107-4 : ग्लेन फिलिप्सच्या रुपात न्यूझीलंडला चौथा धक्का

95-3 : ड्वेन कॉन्वेच्या रुपात न्यूझीलंडने गमावली तिसरी विकेट. 38 चेंडूत 46 धावांची उपयुक्त खेळी करणाऱ्या कॉन्वेला लिविंगस्टोनने केलं बाद

13-2 : केन विल्यमसनही स्वस्तात माघारी, क्रिस वोक्सला मिळाले दुसरे यश

4-1 क्रिस वोक्सने इंग्लंडला मिळवून दिले पहिले यश, मार्टिन गप्टील अवघ्या 4 धावा करुन माघारी

इंग्लंडच्या संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 20 षटकात 166 धावा केल्या आहेत.

मोईन अलीचे नाबाद अर्धशतक

156-4 नीशमनं घेतली लिविंग्स्टोनची विकेट, त्याने 10 चेंडूत 17 धावांचे योगदान दिले.

116-3 साउदीनं फोडली, मलान-मोईनची जोडी, डेविड मलानने 30 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 42 धावा केल्या

सोधीच्या गळाला लागला मोठा मासा, बटलर 24 चेंडूत 29 धावा करुन माघारी

जॉनी बेयरस्टोच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का, मिल्नेच्या गोलंदाजीवर केन विल्यमसनने टिपला झेल. बेयरस्टोनं 17 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने केल्या 13 धावा

बटलर-बेयरस्टो जोडीनं केली इंग्लंडच्या डावाला सुरुवात

न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT