Virat Kohli Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

हॅप्पी दि एन्ड..विराट ठरला टॉसचा बॉस

विराटच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा आयसीसीची मोठी स्पर्धा जिंकण्यात टीम इंडियाच्या पदरी निराशा आली.

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील शेवटचा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. नामिबिया विरुद्धचा सामना विराट कोहलीसाठी खास असा आहे. याच कारण या सामन्यानंतर विराट कोहली टी-20 संघाच्या कर्णधार असणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच विराट कोहलीने टी20 संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेत विशेष छाप सोडेल अशी आशा होती. मात्र हे स्वप्नच राहिले आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा आयसीसीची मोठी स्पर्धा जिंकण्यात टीम इंडियाच्या पदरी निराशा आली. कॅप्टन्सीच्या अखेरच्या सामन्यात टॉसचा बॉस होण्याच भाग्य मात्र विराट कोहलीला लाभले. टॉस जिंकून त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यंदाच्या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात दुसऱ्यांदा त्याने टॉस जिंकला आहे. बहुतांश टॉस हे विराटच्या विरोधात लागल्याचे पाहायला मिळाले आहे. याची चांगली चर्चाही रंगते. विराट ज्यावेळी टॉस जिंकतो त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर गजबवाली स्माईल दिसते. आजही ती स्माईल पाहायला मिळाली.

भारतीय संघाला स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड संघाने त्यांना सलग दुसऱ्या पराभवाचा धक्का दिल्यानंतर टीम इंडिया अडचणीत आली. अफगाणिस्तान विरुद्ध त्यांनी 200 + धावा करुन यंदाच्या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. स्कॉटलंड विरुद्धही विराटने टॉस जिंकला आणि बर्थ डे दिवशी त्याल विजयी गिफ्ट मिळाले. पण स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील अखेरचा सामना भारतीय संघ मोठ्या दिमाखात जिंकून शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT