India vs Namibia sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

थँक्स कॅप्टन कोहली आणि कोच शास्त्री, टीम इंडियाने दिला विजयी निरोप

या धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली.

सुशांत जाधव

T20 World Cup 2021, India vs Namibia : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला. भारतीय संघाने 9 गडी राखून सामना जिंकला. नामिबियाने भारतीय संघासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली.

रोहित शर्मा बाद होऊन परतल्यानंतर सुर्यकुमार मैदानात उतरला. दुसरीकडे लोकेश राहुलने अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार आणि लोकेश राहुलनं 16 व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाचा स्पर्धेतील प्रवास आधीच संपुष्टात आला होता. नामिबिया विरुद्धच्या सामन्यातील मोठ्या विजयासह टीम इंडियाने प्रशिक्षक रवि शास्त्री आणि कॅप्टन कोहलीला निरोप दिला.

विराट कोहलीने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर बार्ड आणि मायकल वॅन या जोडीनं नामिबियाच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 33 धावा असताना बुमराहने मायकल वॅनला 14 धावांवर बाद केले. क्रॅग विल्यमसन जाडेजाच्या गोलंदाजीसमोर गडबडला. 72 धावांत नामिबियाचा अर्धा संघ तंबूत परतला होता. अष्टपैलू विसेनं 26 धावांची चिवट खेळी करुन संघाचा डाव सावरला. तळाच्या फलंदाजीत जॅन फ्रायलिंकने नाबाद 15 तर रिबेनने 6 चेंडूत 13 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 132 पर्यंत पोहचवली. भारताकडून रविंद्र जाडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी 3-3 तर जसप्रित बुमराहने 2 विकेट घेतल्या

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची सुमार कामगिरी पाहायला मिळाली. वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. इथूनच भारतीय संघाची कसरत सुरु झाली. न्यूझीलंडवरील पराभवामुळे अडचणीत भर पडली. त्यानंतर भारतीय संघाने उर्वरित तीन सामने धडाकेबाज पद्धतीने जिंकले. पण त्यांचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT