Akhtar vs Tendularkar   Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

...तर तेंडुलकरच्या खात्यात एक लाख धावा असत्या : अख्तर

मला सचिन घाबराचा, असे कधीही म्हटलेले नाही, असे अख्तरने यावेळी सांगितले.

सुशांत जाधव

T20 World Cup 2021 India Vs Pakistan: टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची सलामीची लढत पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हायहोल्टेज सामन्यापूर्वी क्रिकेट वर्तुळात चर्चेचं वातावरण चांगलेच तापले आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर आणि भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ एका वृत्त वाहिनीवरील खास कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरवर स्तुती सुमनांचा अक्षरश: वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.

सध्याच्या घडीला क्रिकेट जगतात सचिन तेंडुलकरच्या नावे सर्वाधिक धावा आहेत. त्याचा हा विक्रम विराट कोहली मागे टाकेल, अशी चर्चाही रंगते. मात्र शोएब अख्तरने सचिन सर्वकालीन महान खेळाडू असल्याचे म्हटले आहे. 2016 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ग्रेट भेट झाल्याचा दावाही त्याने यावेळी केला.

सचिनने स्वत:च्या हाताने जेवण करुन मला खाऊ घातले होते. त्याच्यासारखा फलंदाज होणं नाही, असे अख्तर यावेळी म्हणाला. यावेळी त्याने गुवाहटीमध्ये आपल्या चेंडूवर सचिन फॅक्चर होऊनही खेळल्याचा किस्साही शेअर केला. सचिन तेंडुलकर मला घाबरायचा, असे मी कधीही म्हटलेलो नाही. सचिन जर आजच्या घडीला खेळत असता तर त्याने लाखभर धावा केल्या असत्या, असे मोठे विधानही अख्तरने केले.

शेन वॉर्न, मेग्रा, वसिम आक्रम आणि वकार युनिस या दिग्गज गोलंदाजांचा सचिनने सामना केला आहे. दहा वर्षानंतर त्याने ब्रेटली आणि माझ्या गोलंदाजीही खेळली. ही गोष्ट सचिनच्यातील क्षमता सिद्ध करणारी आहे, असे अख्तरने म्हटले आहे. सचिनसोबतच अख्तरने हिटमॅन रोहित शर्माचेही कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT