MS Dhoni Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

मेंटॉर धोनीला आणखी एक स्पेशल रोल; BCCI नं शेअर केले फोटो

या भूमिकेनंतर आता धोनीकडे आणखी एक खास जबाबदारी देण्यात आली आहे.

सुशांत जाधव

T20 World Cup : आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकण्याचा अनोखा विक्रम असलेला धोनी निवृत्तीनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाला विश्वविजेता बनवण्यासाठी सज्ज झालाय. बीसीसीआयने वर्ल्ड कप संघाची घोषणा करताना महेंद्रसिंह धोनीला मेंटॉर म्हणून नियुक्त करत सर्वांना सरप्राइज दिले. या भूमिकेनंतर आता धोनीकडे आणखी एक खास जबाबदारी देण्यात आली आहे.

मेंटॉर महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) थ्रोडाउन स्पेशलिस्टच्या रुपात भूमिका बजावताना पाहायला मिळाले. भारतीय संघाच्या सराव सत्रातील काही फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत. यात धोनी संघातील खेळाडूंचा थ्रो डाउनचा सराव घेताना दिसते. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंना चांगलीच पसंती मिळताना दिसते.

बीसीसीआयने धोनीचे फोटो शेअर करताना त्याला खास कॅप्शनही दिले आहे. यात धोनी हा भारतीय संघाचा नवा थ्रो डाउन स्पेशलिस्ट असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तीन वेगवेगळ्या फोटोत धोनी नेटमध्ये थ्रो डाउनचा सराव करुन घेताना पाहायला मिळते.

सराव सामन्यावेळीही धोनी मैदानाबाहेर उभा राहून संघातील खेळाडूंना सूचना करताना दिसले होते. धोनी थ्रो डाउन करताना दिसणे ही गोष्ट आश्चर्यकारक नसली तरी बीसीसीआयने खास कॅप्शनसह त्याचे फोटो शेअर केल्यामुळे धोनी वेगवेगळ्या भूमिका बजावत असल्याचे समोर येत आहे.

भारतीय संघाने सराव सामन्यात दमदार कामगिरी करुन दाखवली होती. पहिल्या सामन्यात त्यांनी इंग्लंडचा धुव्वा उडवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचाही एकहाती पराभव केला होता. 24 आक्टोबरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात करणार आहे. पाकिस्तान विरुद्धचे वर्ल्ड कपमधील रेकॉर्ड कायम ठेवून विजयी षटकार खेचण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल.

नेट प्रॅक्टिससाठी UAE त संघासोबत असणारे खेळाडू

आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमान मेरीवाला, व्यंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद आणि कृष्णप्पा गौतम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT