शोएब अख्तर शोएब अख्तर
क्रिकेट वर्ल्ड कप

‘घाबरू नका’नंतर ‘सोडू नका’; पाकिस्तान संघाला संदेश

सकाळ डिजिटल टीम

दुबई : विश्वचषकात भारताविरुद्ध कधीही विजय न मिळाल्याने पाकिस्तान संघाला माजी खेळाडूंनी ‘घाबरू नका’ असा नारा दिला होता. याचा लाभ संघाला झाला आणि भारताला दहा गड्यांनी पराभूत केले. यामुळे पाकिस्तान संघाचे मनोबल वाढले आहे. मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संघाला न्यूझीलंडला ‘सोडू नका’ असा संदेश माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने दिला आहे.

विश्वचषक सुरू होण्याआधी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानचा दौऱ्यावर गेला होता. सामन्या सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच दौरा रद्द करून न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतला. यानंतर इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा रद्द केला. यामुळे क्रिकेट विश्वास पाकिस्तानची मोठी बदनामी झाली. याचाच बदला घेण्यासाठी न्यूझीलंडला न सोडण्याचा सल्ला शोएब अख्तरने दिला आहे. पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्यापूर्वी त्याने हा सल्ला दिला.

न्यूझीलंडचा संघ तीन एकदिवसीय, तीन टी-२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. ज्या दिवशी सामना सुरू होणार होता त्याच दिवशी न्यझीलंडचा संघ मायदेशी परतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अनेक प्रयत्नानंतरही ते सामना खेळण्यासाठी तयार झाले नाही. अचानक दौरा रद्द झाल्याने पाकिस्ताना क्रिकेट बोर्डाला मोठे नुकसान सहन कराव लागले. त्याच्याच राग धरून हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SL A, ODI: शेवटच्या चेंडूवर मोठा ड्रामा अन् मग सुपर ओव्हरचा थरार... अखेर भारताचा सलग दुसरा पराभव; आता फायनल कशी गाठणार?

CM Interview : इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत

IND vs ENG ODI: इंग्लंड वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? विराट कोहली तंदुरुस्त, पण हार्दिक अजूनही दुखापतीनं त्रस्त

MP Naresh Mhaske : नवी मुंबईत तर 'नाईक जनता पार्टी' चालते; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

डिझाइन, शाश्वतता आणि प्रवासी अनुभव... नवी मुंबई विमानतळाचा मोठा सन्मान! ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळ’ यादीत समावेश

SCROLL FOR NEXT