Scotland Kit Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T 20 WC मधील बेस्ट जर्सी अन् 12 वर्षांच्या डिझायनरची चर्चा

तिच्या कौशल्यामुळे नेटकरी चांगलेच प्रभावित झाले असून सोशल मीडियावर या मुलीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

सुशांत जाधव

T20 WC, Scotland Kit: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडच्या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभवाचा धक्का देत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. यंदाच्या स्पर्धेत स्कॉटलंडचा संघ जे किट घालून मैदानात उतरलाय त्याचीही चांगलीच चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे स्कॉटलंड संघाच्या जर्सीचे डिझाइन हे 12 वर्षांच्या मुलीने केले आहे. तिच्या कौशल्यामुळे नेटकरी चांगलेच प्रभावित झाले असून सोशल मीडियावर या मुलीवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

12 वर्षीय Rebecca Downie हिने स्कॉटलंड संघाच्या जर्सीचे डिझाइन केले आहे. स्कॉटलंड क्रिकेट बोर्डाने ट्विटच्या माध्यमातून Rebecca Downie चे आभार मानले आहेत. क्रिकेट बोर्डाने ती स्कॉटलंडचा पहिला सामना पाहतानाचा फोटोही शेअर केलाय.

वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होण्यापूर्वी स्कॉटलंड क्रिकेट बोर्डाने एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत वेगवेगळ्या भागातील 200 शालेय विद्यार्थी सहभागी होते. या विद्यार्थ्यांकडून वर्ल्ड कपसाठी जाणाऱ्या स्कॉटलंड संघाची जर्सी कशी असावी? यासाठी डिझाइनची मागणी करण्यात आली होती. यातील Rebecca Downie चे डिझाइन फायनली सिलेक्ट झाले.

पर्पल रंगाची स्कॉटलंडटी जर्सी सध्या सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटत असून वर्ल्ड कप स्पर्धेतील हे सर्वोत्तम डिझाइन असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. स्कॉटलंडचा संघ ज्यावेळी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला तो दिवस संघासह Rebecca Downie साठीही खास होता. वर्ल्ड कपला रवाना होण्यापूर्वी संघातील खेळाडूंनी तिची भेटही घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT