Sri Lanka vs Namibia Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup : लंकेचीही विजयी सलामी! पण...

श्रीलंकेनं स्पर्धेतील पहिला सामना 7 गडी राखून खिशात घातला

सुशांत जाधव

T20 World Cup 2021 Sri Lanka vs Namibia; टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अ गटात झालेल्या नामीबीया विरुद्धच्या लढतीत श्रीलंकेनं बाजी मारली आहे. श्रीलंकेचा कर्णधार दुशन शनाकाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. महिश तिकक्षणा (Maheesh Theekshana), लाहिरु कुमारा (Lahiru Kumara) आणि हसरंगा यांच्या या त्रिकुटाने नवख्या नामीबीयाच्या फलंदाजांना अक्षरश: नाचवले. तिक्षणाने सर्वाधिक तीन तर लाहिरु आणि हसरंगाने प्रत्येकी दोन बळी टिपले. चमीरा आणि करुणारत्नेन एक-एक विकेट घेत या त्रिकुटाला उत्तम साथ दिली. परिणामी नामीबीयाचा डाव 19.3 षटकात अवघ्या 96 धावांत आटोपला. दुबळ्या संघाविरुद्ध मोठा विजय नोंदवून श्रीलंकेला धमाकेदार विजयी सलामी देण्याची संधी होती. पण त्यांनी शंभरीच्या आतील आव्हान परतवताना तीन विकेट गमावल्या.

नामीबीयाला शंभरीच्या आत गुंडाळल्यानंतर श्रीलंकेचे आघाडीचे फलंदाज या धावसंख्या सहज पार करतील असे वाटत होते. पण धावफलकावर 14 धावा असताना श्रीलंकेचा सलामीवीर कुशल परेरा झेलबाद झाला. रुबेनने त्याला 11 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत नामीबीयाला मिळालेले हे पहिले यश ठरले. परेराच्या पाठोपाठ दुसरा सलामीवीर पथुम निसंकाही 5 धावांची भर घालून चालता झाला. दिनेश चंडीमललाही केवळ 5 धावा करता आल्या.

आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर अविष्का फर्नांडो आणि भानुका राजपक्षा या दोघांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 74 धावांची भागीदारी करत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला. फर्नांडोनं 28 चेंडूत दोन उत्तुंग षटकाराच्या मदतीने 30 धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला अविष्कानं 27 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 42 धावांची खेळी केली.

श्रीलंका आणि नामीबीया यांच्याशिवाय अ गटात आयर्लंड आणि नेदरलंड हे दोन संघ आहेत. या सामन्यापूर्वी आयर्लंडने नेदरलंडला पराभूत करत सुपर 12 गटात एन्ट्री मारण्यासाठी दावेदारी भक्कम केली होती. या गटातील अव्वल दोन संघ सुपर 12 गटात खेळण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT