Sri Lanka vs Netherland Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T-20 World Cup Record : निच्चांकी कामगिरीचा दुसरा अंक

कॉलीन 11 धावा वगळल्या तर नेदरलँड्सच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही.

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास आधीच संपुष्टात आलेल्या नेदरलँड्सवर आणखी एक नामुष्की ओढावली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्यांचा डाव अवघ्या 44 धावांत आटोपला. श्रींलकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हसरंगा, लाहिरु कुमारा यांच्या प्रत्येकी 3-3 विकेट आणि महिश तिक्षणाच्या दोन विकेट्सच्या जोरावर श्रीलंकने नेदरलँड्सचा डाव स्वस्तात आटोपला. दुशमंथा चमिरानेही एक विकेट घेतली. नेदरलँड्सनं एक विकेट रन आउटच्या रुपात गमावली.

कॉलीन अ‍ॅक्रमनच्या 11 धावा वगळल्या तर नेदरलँड्सच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. इतर खेळाडूंची धावसंख्येचा आकडा हा एखाद्या टेलिफोन क्रमांकाप्रमाणेच दिसत होता. तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. नेदरलँड्सने 10 षटकात 10 गडी गमावले.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा त्यांच्यावर अशी नामुष्की ओढावली आहे. या स्पर्धेत निच्चांकी धावसंख्येची नोंद ही नेदरलँड्सच्या नावेच आहे. विशेष म्हणजे 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नेदरलँड्सचा संघ 39 धावांत आटोपला होता. यावेळी त्यांना 10.3 षटके खेळली होती. यावेळी तीन चेंडू कमी खेळून नेदरलँड्सच्या संघाने 5 धावा अधिक काढल्या.

नेदरलँड्सच्या पाठोपाठ या यादीत न्यूझीलंडचा नंबर लागतो. श्रीलंकेनंच न्यूझीलंडला 60 धावांत ऑल आउट केलं होते. 2014 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडवर ही नामुष्की ओढावली होती. आयर्लंड 68,हाँगकाँगच्या 69 तर बांगलादेश टी-20 वर्ल्ड कपमध्ये 70 धावांत ऑल आउट झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT