Sunil Gavaskar esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 विश्वचषकात 'या' टीमपासून सावध रहा; अकरम-गावस्करांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अकरमनं टी -20 विश्वचषकात खेळणाऱ्या प्रत्येक संघाला इशारा दिलाय.

T20 World Cup 2021 : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अकरमनं टी -20 विश्वचषकात खेळणाऱ्या प्रत्येक संघाला इशारा दिलाय. अकरमनं सर्व संघांनी अफगाणिस्तान क्रिकेट संघापासून दूर रहावं, असं सांगितलंय. आज तकच्या 'सलाम क्रिकेट-2021' या विशेष कार्यक्रमात वसीम अकरम म्हणाला, अफगाणिस्तान स्वतः पुढच्या फेरीत जाऊ शकत नसला, तरी तो अनेक संघांचं नुकसान करू शकतो, असं त्यानं म्हंटलंय.

अफगाणिस्तानच्या सांघिक खेळाबद्दल बोलताना अकरम म्हणाला, या संघात चांगले फलंदाज असून रशीद खान, मुजीब आणि नूर अहमदसारखे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. यामुळे उर्वरित संघांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. माजी पाकिस्तानी दिग्गजानं युवा चायनामन गोलंदाज नूर अहमदचं देखील कौतुक केलंय. नूर अहमदची गुगली समजून घेणं हे फलंदाजांसाठी आव्हान असेल. यासह अकरमनं अष्टपैलू मोहम्मद नबीचंही तोंडभरुन कौतुक केलंय. अकरम पुढे म्हणाला, या संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे पराभवाला कधीच घाबरत नाहीत आणि यामुळंच त्यांच्या संघाला अधिक फायदा होत आहे.

अकरमशिवाय, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही अफगाणिस्तान संघाचं कौतुक केलंय. ते म्हणाले, अफगाणिस्तानकडे गमावण्यासारखं काहीच नाही. त्यांच्यावरील दबाव मोठ्या संघांपेक्षा खूपच कमीय, याचा निश्चितच त्यांना फायदा होईल. तसेच अफगाणिस्तानातील काही खेळाडूंना आयपीएल आणि पीएसएल सारख्या मोठ्या लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळं याचा देखील त्यांना लाभच होईल, असं त्यांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT