Afghanistan Cricket Team Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

AUS vs AFG: चॅम्पियन! DJ ब्रावोच्या गाण्यावर ऑस्ट्रेलियाला हरवणाऱ्या अफगाणिस्तान संघाने बसमध्येच धरला ठेका, Video व्हायरल

T20 World Cup 2024, Afghanistan vs Australia: टी20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाने बसमध्येच विजयाचा जल्लोष केला. यावेळी ते ब्रावोच्या गाण्यावरही डान्स करताना दिसले.

Pranali Kodre

Afghanistan Cricket Team Dance Video: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात 22 जून रोजी सामना झाला. सेंट विन्सेंट येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

दरम्यान, अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला मात दिल्याने आता अनेक समीकरणे बदलल्याचे दिसून येत आहे.

अफगाणिस्तानसाठी हा विजय ऐतिहासिकतही ठरला. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला हा अफगाणिस्तानचा पहिलाच विजय ठरला. त्यामुळे अफगाणिस्तानने या विजयाचा जोरदार जल्लोष केला.

तसेच विजयानंतर पुन्हा हॉटेलकडे जात असताना बसमध्येही अफगाणिस्तान संघाचे सेलीब्रेशन सुरू होते. यावेळी अफगाणिस्तानचा गोलंदाजी सल्लागार ड्वेन ब्रावो याने काही वर्षांपूर्वी गायलेल्या त्याच्या 'चॅम्पियन' या गाण्यावर खेळाडूंनी त्याच्यासह डान्सही केला. याचा व्हिडिओही सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर अफगाणिस्तान प्रथम फलंदाजीसाठी उतरले होते. अफगाणिस्तानकडून रेहमनुल्लाह गुरबाजने 49 चेंडूत सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच इब्राहिम झाद्रानने 48 चेंडूत 51 धावांची खेळी केली.

या दोघांनी सलामीला 118 धावांची भागीदारीही केली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानचा संघाला 20 षटकात 6 बाद 148 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना पॅट कमिन्सने हॅट्रिक घेतली. तर ऍडम झाम्पाने 2 विकेट्स घेतल्या आणि मार्कस स्टॉयनिसने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ 19.2 षटकात 127 धावांवरच सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 59 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. पण त्याला कोणाची साथ मिळाली नाही. त्याच्याव्यतिरिक्त केवळ स्टॉयनिस (11) आणि कर्णधार मिचेल मार्श (12) यांनीच दुहेरी आकडा पार केला.

अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर नवीन-उल-हकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच अझमतुल्लाह ओमरझाई, कर्णधार राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

IND vs SLC XI Warm-Up: देवदत्त पडिक्कलचे अर्धशतक, तरीही पहिल्या कसोटीत संधी मिळणे अवघड; कारण 'तो' येतोय, नेमकं काय शिजतंय?

Siddhivinayak Temple : ठाकरे गटाची अडचण वाढणार? सिद्धिविनायक मंदिरातील देणगी व्यवहारांची मागील पाच वर्षांची होणार चौकशी; सीएम फडणवीसांचे आदेश

IPL 2027 Trade Update: हार्दिक पांड्याच नव्हे, तर Mumbai Indians 'या' पाच खेळाडूंना करू शकते संघाबाहेर; MI चा मास्टर प्लान

Latest Marathi News Live Update : "मोदी गद्दारांना सांगतायत, भीऊ नका मी पाठीशी"- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT