Pat Cummins Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: W,W,W...कमिन्सचा राडा! सुपर-8 मधील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी घेतली हॅट्रिक, पाहा Video

Pat Cummins hat-trick: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने वर्ल्ड कप 2024 मधील पहिली हॅट्रिक घेतली आहे.

Pranali Kodre

T20 World Cup, Bangladesh vs Australia: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर-8 फेरीत ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना शुक्रवारी (21 जून) बांगलादेशविरुद्ध झाला. अँटिग्वामध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने हॅट्रिक साजरी केली.

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशच्या महमुद्दुलाह, मेहदी हसन आणि तोहिद हृदोय यांना सलग 3 चेंडूवर बाद करत हॅट्रिक घेतली. त्याच्या या विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला 20 षटकात 8 बाद 140 धावांवरच रोखले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बांग्लादेश प्रथम फलंदाजीसाठी उतरले. मात्र त्यांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यांचा सलामीवीर तांझिद हसनला मिचेल स्टार्कने शुन्यावरच माघारी धाडले.

मात्र, लिटन दास आणि कर्णधार नजमुल हुसैन शांतो यांनी डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली, मात्र मधल्या षटकात ऍडम झाम्पा आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे बांगलादेशने काही झटपट विकेट्स गमावल्या. लिटन दास 16 धावांवर, तर शांतो 41 धावांवर बाद झाला. शाकिब अल हसनलाही फार काही करता आले नाही. तो 8 धावा करून बाद झाला.

यादरम्यान हृदोयने चांगली झुंज दिली होती. पण 18 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने कमिन्सच्या हाती चेंडू सोपवला. त्यानेही त्याचे या सामन्यातील तिसरे षटक किफायतशीर टाकताना पहिल्या चार चेंडूत 5 धावाच दिल्या.

यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने महमुद्दुलाहला 2 धावांवर क्लिन बोल्ड केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्याने मेहदी हसनला शुन्यावर बाद केलं. त्याचा झेल झाम्पाने थर्ड मॅनचा पकडला. त्यामुळे 18 व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर दोन विकेट्स कमिन्सला मिळाल्या होत्या. यानंतर तो 20 व्या षटकात गोलंदाजीला उतरला.

त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हृदोयला 40 धावांवर असताना जाळ्यात अडकवलं आणि विकेट घेतली. त्याचा झेल शॉर्ट फाईन लेगला जोश हेजलवूडने घेतला. यासह कमिन्सने हॅट्रिकही साजरी केली.

कमिन्स दुसराच ऑस्ट्रेलियन

टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात हॅट्रिक घेणारा कमिन्स दुसराच ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे. यापूर्वी असा विक्रम ब्रेट ली याने केला आहे. माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्धच केप टाऊनला झालेल्या सामन्यात हॅट्रिक साजरी केली होती.

याशिवाय कमिन्स टी20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा एकूण सातवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम ब्रेट लीबरोबरच कर्टिस कॅम्फर, वनिंदू हसरंगा, कागिसो रबाडा, कार्तिक मय्यपन आणि जोशुआ लिटिल यांनी केला आहे.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा कमिन्स चौथा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाकडून टी20मध्ये ब्रेट लीशिवाय ऍश्टन एगर आणि नॅथन एलिस यांनी हॅट्रिक घेतली. एगरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गला 2020 मध्ये हॅट्रिक घेतलेली, तसेच नॅथन एलिसने मिरपूरला 2021 मध्ये बांगलादेशविरुद्धच हॅट्रिक घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT