Australia | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: कमिन्सची हॅट्रिक, तर वॉर्नरची फिफ्टी; ऑस्ट्रेलियाने विजयासह केली सुपर-8ची सुरुवात

Australia vs Bangladesh: ऑस्ट्रेलियाने टी20 वर्ल्ड कपमधील सुपर-8 मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवला.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, AUS vs BAN: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत शुक्रवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश संघात सामना झाला. अँटिग्वा येथे झालेल्या सामन्यात सातत्याने पावसाचा अडथळा आला. पण ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार 28 धावांनी विजय मिळवला.

हा सुपर-8 मधील ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय ठरला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात पॅट कमिन्स आणि डेव्हिड वॉर्नरने मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात बांगलागेशने ऑस्ट्रेलियासमोर 141 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी अर्धशतकी भागीदारी केली.

पण पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा फलंदाजी चालू झाल्यानंतर हेड 21 चेंडूत 31 धावांवर बाद झाला. तसेच मिचेल मार्श 1 धावेवरच बाद झाला.

मात्र, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल वॉर्नरची साथ देत असताना पुन्हा पावसाचा अडथळा आल्याने सामना थांबवण्यात आला. त्यानंतर पावसामुळे पुन्हा सामना सुरु होऊ शकणार नसल्याने ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार विजेता घोषित करण्यात आले.

सामना थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 11.2 षटकात 2 बाद 100 धावा केल्या होत्या. वॉर्नर 35 चेंडूत 53 धावांवर नाबाद राहिला, तर ग्लेन मॅक्सवेल 14 धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशकडून दोन्ही विकेट्स रिषाद हुसैनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने चांगली सुरूवात केली. त्याने पहिल्याच षटकात तांझिद हुसैनला शुन्यावर माघारी धाडले. पण नंतर लिटन दास आणि कर्णधार नजमुल हुसैन शांतो यांनी डाव सावरला. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली.

परंतु, मधल्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व राखले. मधल्या षटकात ऍडम झाम्पा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विकेट्स मिळवल्या. यादरम्यान लिटन दास 16 धावांवर आणि शांतो 41 धावांवर बाद झाले. तसेच शाकिब अल हसनही 8 धावांवर बाद झाला.

यादरम्यान तोहिद हृदोय चांगला खेळ करत होता. पण 18 व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर पॅट कमिन्सने महमुद्दुलाह (2) आणि मेहदी हसन (0) यांच्या विकेट्स घेतल्या.

त्यानंतर अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हृदोयला 40 धावांवर कमिन्सने बाद केले. यासह कमिन्सने हॅट्रिक साजरी केली. त्यामुळे बांगलादेशला 20 षटकात 8 बाद 140 धावा करता आल्या.

ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच ऍडम झाम्पाने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT