Virat Kohli, Jasprit Bumrah, Rohit Sharma Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: विराट नाही तर 'हा' असेल रोहितचा जोडीदार; अशी असेल टी 20 वर्ल्डकप 2024 ची बेस्ट प्लेईंग 11

Best Playing XI: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा संपली असून या स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन कशी तयार होऊ शकते याचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

T20 World Cup 2024: २० संघ, २९ दिवस आणि ५५ सामने... यानंतर टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला भारतीय संघाच्या रुपात विजेता मिळाला. भारतीय संघाने बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केलं आणि विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

दरम्यान, या संपूर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने लक्ष वेधलं. त्याचमुळे या खेळाडूंमधून सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन कशी तयार होऊ शकते याचा घेतलेला आढावा.

सलामीवीर - रोहित शर्मा, रेहमनुल्लाह गुरबाज

यंदाच्या टी२० वर्ल्ड कपमध्ये सलामीला खेळताना भारताचा रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानच्या रेहमनुल्लाह गुरबाज यांनी शानदार कामगिरी केली आहे. हे दोघे या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडूही आहेत. रोहितने ८ सामन्यांत २५७ धावा केल्या, तर गुरबाजने ८ सामन्यांत २८१ धावा केल्या. याशिवाय रोहित कर्णधारपदाचीही जबाबदारी सांभाळू शकतो.

मधली फळी - निकोलस पूरन, हेन्रिक क्लासेन

मधल्या फळीत निकोलस पूरन आणि हेन्रिक क्लासेन हे दोन्ही यष्टीरक्षक फलंदाज मधल्या फळीची जबाबदारी सांभाळू शकतात. त्यांनी यंदाच्या स्पर्धेत चांगल्या धावाही केलेल्या आहेत. याशिवाय आक्रमक खेळण्याचीही त्यांच्याकडे क्षमता आहे. पूरनने ७ सामन्यांत २२८ धावा केल्या, तर क्लासेनने ९ सामन्यात १९० धावा केल्या.

अष्टपैलू - मार्कस स्टॉयनिस, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल

यंदाच्या टी२० वर्ल्ड कपमध्ये मार्कस स्टॉयनिस, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांची गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही चांगली कामगिरी झाली. स्टॉयनिसने ७ सामन्यांत १६९ धावा करण्याबरोबरच १० विकेट्सही घेतल्या. तसेच हार्दिकने ८ सामन्यांत १४४ धावा आणि ११ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने ९२ धावा आणि ९ विकेट्स घेतल्या.

गोलंदाज - फझलहक फारुकी, जसप्रीत बुमराह, आर्शदीप सिंग, राशिद खान

गोलंदाजांमध्ये फझलहक फारूकी, जसप्रीत बुमराह, आर्शदीप सिंग आणि राशिद खान यांना स्थान मिळू शकते. यातील राशिद खान फलंदाजीतही बऱ्यापैकी योगदान देऊ शकतो.

यंदाच्या स्पर्धेत फारुकी सर्वाधिक १७ विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याच्यासह आर्शदीपनेही १७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहने १५ विकेट्स घेतल्या आहेत, तर राशिदने १४ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याने रचला इतिहास, एका दिवसात ५ हजारांची वाढ, चांदीही तेजीत; जाणून घ्या आजचा ताजा भाव

चाकाखाली लिंबू ठेवला, मी चालवणार म्हणत तरुणीने स्टेअरिंग घेतलं हातात; नवी कोरी थार पहिल्या मजल्यावरून कोसळली, Video Viral

Latest Marathi News Updates : माजी खासदार सुजय विखेंचे बॅनर फाडल्याप्रकरणी फिर्यादी निघाला आरोपी

Indian Railway: रेल्वेच्या जागांचा व्यावसायिक वापर; महालक्ष्मी, वांद्रे येथील जमिनी कोटी रुपयांच्या भाडेतत्त्वावर

Shoumika Mahadik : शौमिका महाडिकांच्या एका वाक्याने भाकरी फिरणार? गोकुळ दूध संघात सभासदांचे गट्टा मतदान असलेल्या आबाजी पुढच्या निवडणुकीत कोणासोबत

SCROLL FOR NEXT