T20 World Cup 2024 Final India Playing 11 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs SA : शिवम दुबेचा पत्ता कट, ओपनर बदलणार? फायनलमध्ये आफ्रिकेविरुद्ध 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

T20 World Cup 2024 Final India Playing 11 : भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना आज शनिवार 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Final India Playing 11 : भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना आज शनिवार 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात रोहितने संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शेवटचा बदल केला होता, ज्यामध्ये मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादव आला होता. आता विजेतेपदाच्या लढतीत शिवम दुबेच्या रूपाने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होऊ शकतो.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या बदलामुळे सलामीच्या जोडीमध्येही फेरबदल होऊ शकतात. खरंतर, अंतिम सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा शिवम दुबेला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळू शकतो. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यापासून दुबे प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे.

अष्टपैलू दुबे आतापर्यंत फक्त फलंदाज म्हणून खेळला आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने फक्त 1 षटक टाकले. तर दुबेला फलंदाजीत फारशी छाप सोडता आलेली नाही. त्याने फिरकीपटूंविरुद्ध काही मोठे फटके नक्कीच मारले आहेत, पण वेगवान गोलंदाजांसमोरही तो असहाय्य दिसत आहे.

दुबेचा खराब फॉर्म लक्षात घेता यशस्वी जैस्वालला अंतिम फेरीत संधी मिळू शकते. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये जैस्वालने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. जैस्वाल प्लेइंग इलेव्हनमध्ये आला झाला तर तो रोहित शर्मासोबत सलामी करू शकतो. तर आतापर्यंत ओपनिंग करणारा विराट कोहली आपल्या जुन्या तीन नंबरवर परत येऊ शकतो. आता अंतिम सामन्यासाठी रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मीरारोडवर अखेर मनसेचा मोर्चा

MNS Mira bhayandar Morcha: हिंदी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी मग मनसेला का नाही? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण...

Viral Video : हृदयस्पर्शी व्हिडिओ ! ममतेची मूर्ती आहे हा गोरिला, आईकडे मूल सोपवून जिंकली लाखो लोकांची मने

Supreme Court: बिहार निवडणुकीवर गहजब; मतदार याद्या सुप्रीम कोर्टाच्या दरबारात

कोविड लसीमुळे येतोय हृदयविकाराचा झटका? खरं कारण आलं समोर; AIIMS, ICMR नंतर कर्नाटक समितीच्या अहवालात काय?

SCROLL FOR NEXT