T20 World Cup 2024 Group B Points Table SAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : इंग्लंड संघाला मोठा धक्का! 'ग्रुप B'चे गणित झाले मनोरंजक.... स्कॉटलंडला अव्वल स्थान कायम ठेवण्याची संधी

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या 17 व्या सामन्यात ‘ब’ गटात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 36 धावांनी पराभव केला आणि दुसरा विजय नोंदवला.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Group B Points Table : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या 17 व्या सामन्यात ‘ब’ गटात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 36 धावांनी पराभव केला आणि दुसरा विजय नोंदवला. प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियन संघाने 20 षटकांत 201/7 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंड संघ संपूर्ण षटके खेळून 165/6 धावाच करू शकला. या सामन्यानंतर ‘ब’ गटाचे गणित मनोरंजक झाले आहे.

आज ‘ब’ गटात स्कॉटलंडचा सामना ओमान संघाविरुद्ध होत आहे. या सामन्यात विजय मिळवून स्कॉटलंडला एकूण ५ गुणांसह आपले पहिले स्थान कायम ठेवण्याची संधी आहे.

अँटिग्वाच्या सर विवियन रिचर्डस् मैदानावर होणारा हा पहिला सामना असेल. स्कॉटलंडचा इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे त्यांना एक गुण मिळाला. त्या अगोदर त्यांनी नामिबियाला हरवून दोन गुणांची कमाई केली होती. त्यामुळे आता त्यांच्या खात्यात ३ गुण आहेत. आजचा सामना जिंकला तर ५ गुण होतील. या गटात इंग्लंडसह ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. प्रत्येक गटातून पहिले दोन संघ सुपर-८ साठी पात्र ठरणार आहेत.

स्कॉटलंडचा कर्णधार रिची बेरिंग्टॉन फॉर्मात आहे. त्याने नामिबियाविरुद्ध नाबाद शतकी खेळी केली होती. त्याच्यासह जॉर्ज मुनसी आणि मिचेल जॉन व ब्रँडन मॅकमलन यांच्याकडून चांगल्या धावा अपेक्षित आहे.

ओमनला पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्यांना प्रथम मानसिकता उंचावावी लागणार आहे.

या विजयासह ऑस्ट्रेलिया 2 सामन्यांत 4 गुणांसह ब गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी, इंग्लंड 2 सामन्यांत 1 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर स्कॉटलंड 2 सामन्यांत 3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि नामिबिया 2 सामन्यांत 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Bullet Ride : देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

तारिणी मालिकेत रेवाची एन्ट्री, केदार-तारिणीच्या आयुष्यात काय परिणाम होणार? अभिनेत्री म्हणाली...'हे सगळं माझ्यासाठी …'

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT