Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup, IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियासाठी 'हे' दोन खेळाडू ठरणार एक्स फॅक्टर, वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा इशारा

India vs Pakistan: पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचे कोणते दोन खेळाडू महत्त्वाचे ठरू शकतात आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल व्हायला हवा, याबाबत माजी क्रिकेटपटूने भाष्य केले आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs Pakistan: टी20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी (9 जून) भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने अनेक चाहते आतुरतेने या सामन्याची वाट पाहत असतात. दरम्यान, आता रविवारी होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

भारताने न्युयॉर्कमध्ये पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळला आहे, ज्यात भारताने विजय मिळवला होता.

पण पाकिस्तानला न्युयॉर्कमध्ये खेळतानाचा अनुभव नाही, त्यांनी डेलासमध्ये अमेरिकेविरुद्ध या स्पर्धेतील पहिला सामना खेळला आहे, ज्यात त्यांना सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, याचाच फायदा भारताला होऊ शकतो असे माजी कर्णधार हरभजन सिंगने म्हटले आहे.

याबरोबरच हरभजनने भारतासाठी महत्त्वाचे ठरू शकणाऱ्या दोन खेळाडूंबद्दलही सांगितले असून प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल व्हायला हवा हे सांगितले आहे. हरभजनने भारताकडून २००७ साली टी२० वर्ल्ड कप जिंकला आहे.

हरभजन सिंगने एएनआयशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, 'या मैदानात आधीच खेळले असल्याचे त्याचा फायदा भारताला होईल, पण पाकिस्तान पाटा खेळपट्टीवर खेळल्यानंतर भारताविरुद्ध खेळणार आहे.'

'पाकिस्तानसाठी हे आव्हान असेल. त्यांना अमेरिकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर या परिस्थितीत स्थिरावणे अवघड असणार आहे. भारतीय संघ चांगलाही खेळत असल्याने त्याचा फायदा होईल.'

याशिवाय हरभजन म्हणाला, 'पाकिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्यात जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे महत्त्वाचे खेळाडू ठरू शकतात. हे दोन्ही खेळाडू मॅच विनर्स आहेत.'

त्याबरोबर हरभजनने एक बदल सुचवताना म्हटले की 'कुलदीप यादव विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याच्याकडे गोलंदाजीतील विविधताही आहे, त्यामुळे तो खेळायला पाहिजे. मला वाटते जेव्हापासून भारताला ८ व्या क्रमांकावर फलंदाजाची गरज भासली, तेव्हापासून अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आले.'

भारताने आयर्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नव्हती. भारताने फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा या दोघांना खेळवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Leader Crime : भाजप नेत्याची गुंडागर्दी! शेतकऱ्याला कारखाली चिरडून मारले, वडिलांना वाचवायला आलेल्या मुलींचेही फाडले कपडे

Chhatrapati Shahu Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडरक्षण हीच खरी शिवसेवा: छत्रपती शाहू महाराज; जय शिवरायचा जयघोष..

Mumbai Rain Update: मुंबईत सायंकाळी वादळी पाऊस! पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप उपांत्य फेरीच्या लढतीवर पावसाचं सावट! सामना न झाल्यास काय होणार? राखीव दिवस आहे का?

भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'श्री विठ्ठलाचे २४ तास पदस्पर्श दर्शन सुरू'; कार्तिकी यात्रेची तयारी पूर्ण..

SCROLL FOR NEXT