Suryakumar Yadav Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs BAN: सूर्यकुमार आला, सिक्स मारला अन् आऊट झाला, पाहा कशी गमावली विकेट

Suryakumar Yadav Wicket: बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी20 वर्ल्ड कपमधील सुपर-8 च्या सामन्यात भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव फलंदाजीला आल्यानंतर एक षटकार मारून लगेचच बाद झाला होता.

Pranali Kodre

T20World Cup 2024, India vs Bangladesh: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुपर-8 फेरीतील सामना शनिवारी (22 जून) झाला. अँटिग्वामधील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 20 षटकात 6 बाद 196 धावा केल्या.

भारताकडून फलंदाजी करताना जवळपास फलंदाजीला आलेल्या सर्वच फलंदाजांनी छोटेखानी पण आक्रमक खेळी केल्या. मात्र, या सामन्यात सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाला. त्याच्या विकेटची सध्या चर्चा आहे.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात केली होती. मात्र रोहित चौथ्या षटकात 11 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्यानंतरही विराटने ऋषभ पंतला साथीला घेत डाव पुढे नेला.

मात्र, 9 व्या षटकात तान्झिम हसन साकिब गोलंदाजीला आला. त्याने पहिल्याच चेंडूवर विराटला 37 धावांवर बाद केले. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला उतरला. त्याने फलंदाजीला आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर साकिबविरुद्ध खणखणीत षटकार मारला.

मात्र त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. उसळी घेतलेल्या चेंडूवर सूर्यकुमार गोंधळला आणि त्याच्या बॅटच्या कडाचा स्पर्श चेंडूला झाला. तो चेंडू यष्टीरक्षक लिटन दासने झेलला. त्यामुळे सूर्यकुमारला 6 धावांवर बाद व्हावे लागले.

दरम्यान, सूर्यकुमार बाद झाल्यानंतरही पंतने आक्रमक 36 धावांची खेळी केली. तर नंतर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या आक्रमणामुळे भारताने 196 धावांचा टप्पा गाठला. हार्दिकने 27 चेंडूत 50 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच शिवम दुबेने 24 चेंडूत 3 षटकारांसह 34 धावांची खेळी केली.

बांगलादेशकडून गोलंदाजीत तान्झिम हसन साकिब आणि रिषाद हुसैन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच शाकिब अल हसनने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT