T20 World Cup 2024 Semi Final Scenario India vs Bangladesh sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : टीम इंडियाच्या विजयाने बदलले उपांत्य फेरीचे समीकरण, 2 संघांवर धोक्याची घंटा

T20 World Cup 2024 India vs Bangladesh : भारतीय संघाने शनिवारी टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 50 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Semi Final Scenario : भारतीय संघाने शनिवारी टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 50 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर टीम इंडिया उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय संघ 4 गुण आणि +2.425 च्या नेट रनरेटने गट-1 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तर दोन संघ संकटात आहेत. यासह टीम इंडियाने उपांत्य फेरीचे समीकरण बदलले आहे.

बांगलादेशाव बाहेर जाण्याचा धोका

या विजयानंतर भारतीय संघ पहिल्या स्थानावर गेला आहे, बांगलादेश संघ शून्य गुणांसह आणि -2.489 च्या नेट रन रेटने 2 सामने गमावल्यानंतर चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. यामुळे तो बाहेर फेकला जाण्याचा धोका आहे. बांगलादेशचा पुढील सामना 25 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यात तो हरला तर त्याचा प्रवास संपुष्टात येईल.

अफगाणिस्तानवरही संकट

त्याचवेळी एक सामना गमावलेल्या अफगाणिस्तानलाही धोका आहे. अफगाणिस्तानने पुढचे दोन सामने जिंकले तर त्याच्या आशा जिवंत राहू शकतात. अफगाणिस्तानचे ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्धचे सामने बाकी आहेत.

ज्यामध्ये जिंकून ते 4 गुणांपर्यंत पोहोचू शकते. एक सामना गमावल्यानंतर सध्या अफगाणिस्तानचा नेट रन रेट -2.350 आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तानही बाहेर पडणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर ते 2 गुण आणि +2.471 च्या नेट रन रेटने दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचे पुढील सामने 23 जून रोजी अफगाणिस्तान आणि 24 जून रोजी भारताविरुद्ध आहेत. अशा स्थितीत, दोन्ही सामने जिंकून ते 6 गुणांपर्यंत पोहोचू शकते, परंतु एका सामन्यात ते हरले तरीही ते 4 गुणांपर्यंत पोहोचू शकते. गट-1 मधील भारत आणि ऑस्ट्रेलियाचे स्थान निश्चित मानले गेले. कोणताही मोठा अपसेट नसेल तर हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. गट-1 च्या गुणतालिकेचा निकाल काय लागतो हे पाहणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT