Suryakumar Yadav Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs AFG: सूर्यकुमारचा धडाका कायम! विराटच्या विश्वविक्रमाशी केली बरोबरी, तर रैनालाही टाकलं मागे

Suryakumar Yadav Record: टी20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यासह त्याने काही विक्रमही केले.

Pranali Kodre

T20 World Cup, India vs Afghanistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुपर-8 मधील सामना गुरुवारी (20 जून) पार पडला. बार्बाडोसला झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 47 धावांनी विजय मिळवला. या विजयात स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला. त्याबरोबरच त्याने काही विक्रमही केले आहेत.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून सूर्यकुमारने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत 28 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 53 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने ही खेळी करताना हार्दिक पांड्याबरोबर 60 धावांची भागीदारीही केली.

त्यामुळे भारताला 20 षटकात 8 बाद 181 धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्यकुमारच्या या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

सूर्याने केली विराटशी बरोबरी

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकण्याची सूर्यकुमारची ही 15 वी वेळ ठरली. त्यामुळे त्याने विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आणि सूर्यकुमार संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत.

विराटनेही 15 वेळा भारताकडून खेळताना टी20मध्ये सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मलेशियाचा विरनदिप सिंग, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी हे तिघे आहेत. या तिघांनीही प्रत्येकी 14 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू

  • 15 वेळा - सूर्यकुमार यादव (64 सामने)

  • 15 वेळा - विराट कोहली (120 सामने)

  • 14 वेळा - विरनदीप सिंग (78 सामने)

  • 14 वेळा - सिकंदर रझा (86 सामने)

  • 14 वेळा - मोहम्मद नबी (126 सामने)

सूर्याने सुरेश रैनालाही टाकले मागे

सूर्यकुमारने अर्धशतकी खेळी करताना वेस्ट इंडीजमध्ये खेळताना टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सुरेश रैनाला मागे टाकले आहे.

सूर्यकुमारने आता वेस्ट इंडिजमध्ये 7 टी20 सामन्यांमध्ये 269 धावा करताना या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे रैना आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. रैनाने वेस्ट इंडिजमध्ये भारताकडून खेळताना टी20 मध्ये 6 सामन्यांत 221 धावा केल्या आहेत.

भारताचा विजय

दरम्यान, भारताने 181 धावा करत अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 षटकात सर्वबाद 134 धावा करता आल्या.अफगाणिस्तानकडून अझमतुल्ला ओमरझाईने सर्वाधिक 26 धावा केल्या. त्याच्याशिवाय कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

गोलंदाजीवेळी भारताकडून अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खान आणि फझलहक फारुकी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच नवीन-उल-हकने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT