Rohit Sharma | India vs Australia Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs AUS: रोहितने रागाच्या भरात कॅच सोडलेल्या ऋषभ पंतला दिली शिवी? Video होतोय व्हायरल

Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान ऋषभ पंतकडून कॅच सुटल्यानंतर रोहित शर्मा भडकल्याचे दिसले होते.

Pranali Kodre

Rohit Sharma Viral Video: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सोमवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुपर-8 मधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 24 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. दरम्यान, या सामन्यातील ऋषभ पंतने एक झेल सोडल्यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या सामन्यात दोन्ही संघांकडून काही चांगले झेल सुटल्याचे दिसले होते. दरम्यान, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यानेही एक महत्त्वाचा झेल या सामन्यात सोडला होता.

झाले असे की भारताने ऑस्ट्रेलियासमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले होते, या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट पहिल्याच षटकात गमावली होती. त्यामुळे ट्रेविस हेडला साथ देण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार मिचेल मार्श उतरला होता.

तो दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असताना एक शॉट खेळताना चूकला आणि चेंडू वर उडाला. यावेळी ऋषभ पंतला झेल घेण्याची संधी होती. मात्र, त्याच्याकडून हा झेल सुटला. यावेळी मार्श शुन्यावर होता.

दरम्यान, पंतकडून सोपा झेल सुटल्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा चिडल्याचे दिसले. याचदरम्यानचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याच रोहितच्या ओठांच्या हालचालींवरून त्याने पंतला अपशब्द वापरल्याचा कयास लावला जात आहे. दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ असून त्याची पुष्टी सकाळ करत नाही.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने 20 षटकात 5 बाद 205 धावा केल्या होत्या. भारताकडून रोहितने 41 चेंडूत 92 धावांची आक्रमक खेळी केली. त्याने या खेळीत 7 चौकार आणि ८ षटकार मारले. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवने 31 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच जोश हेजलवूडने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 181 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तसेच मिचेल मार्शने 37 धावा केल्या. मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice-President Election : देशाचे १७ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज मतदान; NDAचे राधाकृष्णन अन् INDIA चे रेड्डी यांच्यात लढत

Sachin Tendulkar : BCCIच्या अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकर अनुत्सुक? महत्त्वाची अपडेट समोर...नेमकं काय घडतंय?

'Gen Z'समोर झुकलं नेपाळ सरकार, २० मृत्यू अन् गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर बंदी हटवली

Minister Jayakumar Gore: ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; मराठा समाजाला आरक्षण देताना मुख्यमंत्र्यांनी दक्षता घेतली

Paneer Moong Dal Appe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा पनीर मुग डाळ अप्पे, लगेच नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT