India vs Bangladesh Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: भारत-बांगलादेश संघात सुपर-8 ची महत्त्वाची लढत! हेड-टू-हेड रेकॉर्ड अन् हवामान, जाणून घ्या सर्व डिटेल्स

India vs Bangladesh: भारत विरुद्ध बांगलादेश संघात टी20 वर्ल्ड कपमधील सामना अँटिग्वा येथे खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs Bangladesh: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुपर-8 मधील सामना शनिवारी (22 जून) खेळवला जाणार आहे. हा सामना अँटिग्वामधील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

हा दोन्ही संघांचा सुपर-8 मधील प्रत्येकी दुसरा सामना आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध सुपर-8 मधील पहिला सामना खेळला होता, ज्यात भारताने विजय मिळवला होता, तर बांगलादेशला मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यामुळे बांगलादेश आता आव्हान कायम राखण्यासाठी भारताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर भारतीय संघही विजय लय कायम ठेवत उपांत्य फेरीच्या दिशेने पाऊल टाकण्यास उत्सुक असेल.

मात्र, सध्या कॅरेबियन बेटांवर पावसाचा हंगाम असल्याने त्याचा अडथळा सामन्यात येणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात पावसाचा अडथळा आला होता.

दरम्यान, भारत आणि बांगलादेश संघात होणारा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.00 वाजता सुरू होणार आहे.

कसे असेल हवामान

शनिवारी अँटिग्वामधील वातावरण ढगाळ असणार आहे. तसेच Accuweather च्या रिपोर्टनुसार सामन्याच्या सुरुवातीलाच पावसाचा मोठा अडथळा येऊ शकतो. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10-12 दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

तसेच त्यानंतरही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात पावसाचा मोठा अडथळा येण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळे सामना रद्द होऊ शकतो किंवा षटके कमी केली जाऊ शकतात.

जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. मात्र, जर असे झाले, तर भारतासाठी 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशला पराभूत कले, तर ते भारतासाठी सुपर-8 मधून उपांत्य फेरीत जाण्यासाठी आव्हान देऊ शकतात.

आमने-सामने आकडेवारी

भारत आणि बांगलादेश संघात आत्तापर्यंत 13 टी20 सामने खेळवण्यात आळे आहेत. यातील 12 सामने भारताने जिंकले आहेत, तर बांगलागेशने 1 सामना जिंकला आहे.

लाईव्ह स्ट्रिमिंग

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे. त्याचबरोबर डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.

असे आहेत संघ -

  • भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन , युझवेंद्र चहल

  • बांगलादेश संघ: तन्झीद हसन, लिटन दास(यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो(कर्णधार), तौहिद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, रिशाद हुसेन, महेदी हसन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, जाकेर अली, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम, सौम्या सरकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT