Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: भारत-कॅनडा सामना पावसामुळे होणार रद्द? काय आहेत हवामान अंदाज

India vs Canada: भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना शनिवारी फ्लोरिडाला होणार आहे. या सामन्यावेळी फ्लोरिडातील हवामान कसे असेल, जाणून घ्या.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs Canada: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील पहिल्या फेरीमधील भारतीय संघाचा अखेरचा सामना कॅनडाविरुद्ध शनिवारी (१५ जून) होणार आहे. हा सामना फ्लोरिडामधील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर होणार आहे.

हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.

दरम्यान, या सामन्याच्या निकलाचा फार मोठा परिणाम भारतीय संघावर होणार नाही. कारण भारतीय संघाने आधीच पहिले तिन्ही सामने जिंकत सुपर-८ फेरीत स्थान पक्के केले आहे. पण असे असले तरी सुपर-८ फेरीपूर्वीचा हा अखेरचा सामना असल्याने काही प्रयोग करण्याच्यादृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे.

मात्र सध्या अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर पावसाचे सावट आहे. फ्लोरिडामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाचे वातावरण आहे. त्याचमुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येणार का असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

दरम्यान, Accuweather च्या रिपोर्टनुसार सामन्याच्या वेळेदरम्यान ५० टक्क्याहून अधिक पावसाची शक्यता आहे. त्याचमुळे आता जर या अंदाजानुसार पावसाचा अडथळा सामन्यात आला, तर कदाचीत काही षटकांचा खेळ कमी होऊ शकतो किंवा अधिक काळ पाऊस राहिला, तर सामना रद्दही केला जाऊ शकतो.

तथापि, भारतीय संघाने जरी सुपर-८ मधील प्रवेश पक्का केला असला, तरी कॅनडा शर्यतीत कायम आहेत. मात्र, जर शुक्रवारी अमेरिकेने आयर्लंडला पराभूत केले किंवा त्यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर मात्र कॅनडाचे आव्हान संपेल.

पण जर अमेरिका आयर्लंड विरुद्ध पराभूत झाले, तर कॅनडाला शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताविरुद्ध विजय मिळवावाच लागणार आहे.

लाईव्ह प्रक्षेपण कुठे पाहाणार?

दरम्यान भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे. त्याचबरोबर डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT