Team India | Rohit Sharma Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: ऑलराऊंडरची ताकद ते सांघिक कामगिरी... 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया जिंकू शकते वर्ल्ड कप

India vs South Africa: भारतीय संघ टी20 वर्ल्ड कप फायमनलमध्ये कोणत्या 3 कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेला वरचढ ठरू शकतो, याचा घेतलेला आढावा

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs South Africa: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळवला जाणार आहे. बार्बाडोसला होणारा हा अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता चालू होणार आहे.टी२० वर्ल्ड कपमधील अंतिम सामना खेळण्याची ही भारताची तिसरी वेळ आहे, तर दक्षिण आफ्रिकेची पहिलीच वेळ आहे.

विशेष म्हणजे टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत आत्तापर्यंत हे दोन्ह संघ अपराजित आहेत. असे असले तरी भारतीय संघाने आत्तापर्यंत पूर्ण वर्चस्व राखल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारताला हा टी२० वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. भारतीय संघ हा टी२० वर्ल्ड कप का जिंकू शकतो, याची तीन कारणे जाणून घ्या.

अष्टपैलू खेळाडूंची ताकद

भारतीय संघाकडे शिवम दुबे, हार्दिक पांड्या हे वेगवान गोलंदाजी करणारे, तर अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा हे फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत.

या चारही खेळाडूंना भारतीय संघव्यवस्थापनाने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली असल्याने संघात समतोलपणा राखता आला आहे. फलंदाजीत क्रमांक ८ पर्यंत सखोलता आहे, तर गोलंदाजीतही विविध पर्याय यामुळे उपलब्ध होतात. याचाच फायदा आत्तापर्यंत भारताला झाला आहे.

घातक गोलंदाजी

भारताकडे जसप्रीत बुमराह, आर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाज सुरुवातीला आणि शेवटी भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. आर्शदीपने सुरुवातीला मोठे यश मिळवून दिले आहे, तर बुमराहने मोक्याच्या क्षणी विकेट्स काढल्या आहेत. त्यांना हार्दिक पांड्याचीही साथ मिळत आहे. याशिवाय मधल्या षटकात कुलदीप यादव, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंविरुद्ध धावा काढणं प्रतिस्पर्ध्यांना अत्यंत कठीण जाताना दिसत आहे.

त्यामुळे दक्षिण आफ्रिकेलाही भारताच्या या घातक गोलंदाजीचा सामना करणे सोपे राहणार नाही.

सांघिक कामगिरी

भारतीय संघाने आत्तापर्यंत प्रत्येक सामन्यात सांघिक कामगिरी केलेली दिसून आली आहे. म्हणजेच भारतीय संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून राहिलेला नाही.

ज्यावेळी सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अपयशी ठरलेत, त्यावेळी मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी उचलल्याचे दिसून आले. याशिवाय कधी अक्षर पटेल, तर कधी कुलदीप यादव, कधी जसप्रीत बुमराह, कधी आर्शदीप सिंग असे खेळाडू गोलंदाजीत हिरो ठरताना दिसले आहेत. त्यामुळे ही भारतासाठी जमेची बाजू असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

Nagarparishad Reservation 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर! राज्यातील ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, तर २३ एसी-एसटीसाठी राखीव, ओबीसी महिलांना किती?

Samsung Galaxy च्या तीन नव्या सिरीज लाँच; 7 हजारपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, दमदार फीचर्स अन् जबरदस्त ऑफर्स..

CJI B. R.Gavai : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, आरोपी म्हणाला, सनातन धर्म जर...

Video: 'तुझं हे जे सुरुये ते बंद कर' निक्कीने आरबाजला झापलं! म्हणाली...'बाहेर काय सुरुये हे तुला...'

SCROLL FOR NEXT