क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup Semi Final : सेमी-फायनलमध्ये 2 टीम कन्फर्म! 2 बाहेर, तर 'या' 2 वर टांगती तलवार, जाणून घ्या संपूर्ण समीकरण

T20 World Cup Semi Final : आज वर्ल्ड कप 2024 मध्ये यजमान वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला गेला.

Kiran Mahanavar

T20 World Cup Semi Final : आज वर्ल्ड कप 2024 मध्ये यजमान वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला गेला. हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा होता. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा तीन गडी राखून पराभव केला. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने आता वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ आता वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.

'या' दोन संघांनी गाठली उपांत्य फेरी

टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंड हा पहिला संघ होता. इंग्लंडने अमेरिकेचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आता दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करून उपांत्य फेरीत थाटात एन्ट्री मारली.

'हे' दोन संघ बाहेर

या वर्ल्ड कपचे यजमान देश वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहेत. या दोन्ही संघांचा गट-2 मध्ये समावेश करण्यात आला होता. यूएसएला इंग्लंडने तर वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिकेने बाहेर काढले.

आता 'या' दोन संघांमध्ये रंगली लढत

टीम इंडिया ग्रुप-1 मधून सेमीफायनलसाठी जवळपास पात्र ठरली आहे. तर बांगलादेश उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत आहे. या दोन्ही संघांना आपापले सामने जिंकावे लागतील. ऑस्ट्रेलियाचा सामना टीम इंडियाशी होणार असून अफगाणिस्तानचा सामना बांगलादेशशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT