England Cricket team Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs ENG: 'भारताला हरवायचे असेल, तर...', सेमीफायनलपूर्वी इंग्लंडला टी20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचा इशारा

T20 World Cup 2024: भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा उपांत्य सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी दिग्गज क्रिकेटपटूने इंग्लंड संघाला महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs England: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत आणि इंग्लंड संघात गुरुवारी (27 जून) उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. हा सामना रात्री 8 वाजता गयानामध्ये चालू होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला अंतिम सामना खेळण्याची संधी आहे, त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी जीवाची बाजी लावताना दिसतील.

दरम्यान, या सामन्यात आमने-सामने येण्यापूर्वी इंग्लंडचा माजी अष्टपैलू पॉल कॉलिंवूडने मान्य केले आहे की भारत इंग्लंडविरुद्ध प्रबळ दावेदार म्हणूनच खेळेल. तसेच त्याने भारतीय संघाची काय ताकद आहे, यावरही भाष्य केले आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या प्रेस रुमध्ये 2010 सालचा टी20 वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडचा कर्णधार कॉलिंगवूड म्हणाला, 'प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर मला वाटत नाही की भारत इथे हरेल. भारतीय संघाला हरवण्यासाठी इंग्लंडला खूप विलक्षण असे काहीतरी करावे लागेल.'

'भारताचा एक चांगला संघ आहे आणि त्यातच जसप्रीत बुमराहचा सध्याचा फॉर्म त्यांना वेगळं बनवतो. तो वेगवान आहे, अचूक गोलंदाजी करतो आणि कौशल्यपूर्ण आहे. त्यासाठी कोणत्याही संघाकडे उत्तर नाही.'

'ज्या सामन्यात 120 चेंडू असतात, त्यावेळी बुमराह सारखा खेळाडू संघात असल्याने मोठा फरक पडू शकतो. त्याचे 24 चेंडू मोठा फरक पाडू शकतात. भारतीय संघ कठीण परिस्थितीतही विश्वासाने भरलेला वाटला आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळी खेळला, ज्यामुळे तो परत फॉर्ममध्ये आल्याचे दिसले.'

तसेच गयानामधील खेळबट्टीबद्दल बोलताना कॉलिंगवूड म्हणाला, 'दोन्ही संघांची आक्रमक दृष्टीकोन स्वीकारलेला आहे. गयानातील खेळपट्टी महत्त्वाची असेल. सपाट खेळपट्टीवर इंग्लंडचे वर्चस्व राहू शकते, तर धीम्यागतीची आणि चेंडू फिरणारी खेळपट्टी असेल, तर त्याचा फायदा भारताला होईल.'

कॉलिंगवूडने भारतीय संघाने स्वीकारलेल्या आक्रमक दृष्टीकोनाचेही कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT