Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup सुरु असतानाच टीम इंडियाचे 'हे' दोन खेळाडू मायदेशी परतणार

Team India: भारतीय संघाचे सुपर-8 मधील स्थान पक्के झाल्यानंतर आता दोन खेळाडू मायदेशी परत येणार आहेत.

Pranali Kodre

Team India: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारतीय संघाची आत्तापर्यंतची कामगिरी चांगली झाली आहे. भारताने पहिल्या फेरीतील पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे सुपर-8 मधील स्थानही पक्के केले आहे.

अशात आता अशी माहिती मिळत आहे की सध्या भारतीय संघाबरोबर असलेले शुभमन गिल आणि आवेश खान हे दोन खेळाडू मायदेशी परतण्याची शक्यता आहे.

भारताने पहिले तिन्ही सामने न्युयॉर्कला झाले. त्यानंतर आता पहिल्या फेरीतील अखेरचा सामना कॅनडा विरुद्ध फ्लोरिडाला होणार आहे. भारतीय संघ फ्लोरिडाला पोहचला आहे.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार फ्लोरिडाला शनिवारी (15 जून) सामना झाल्यानंतर शुभमन गिल भारतात परतणार आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज आवेश खान हा देखील मायदेशी परत येऊ शकतो.

शुभमन गिल आणि आवेश या दोघांचाही या टी20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे. दरम्यान, अशी माहिती मिळत आहे की पहिल्या फेरीत दुखापतींसाठी खबरदारी म्हणून हे दोघेही भारतीय संघाबरोबर होते. कारण जर संघातील एखाद्या खेळाडूला दुखापत झाली असती, तर त्यांना त्वरित अमेरिकेत पाठवणे कठीण झाले असते.

त्यामुळे या दोघांनाही 14 जून किंवा 15 जून पर्यंत संघासह थांबण्यास सांगण्यात आले होते.

तथापि, सध्या कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली सलामीला फलंदाजी करत आहे. त्यामुळे यशस्वी जैस्वाल सलामीसाठी एक पर्याय आहे. त्याचबरोबर भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये खेळताना फिरकी गोलंदाजांना अधिक संधी देण्याची शक्यता आहे. त्याचमुळे गिल आणि आवेश परत येऊ शकतात.

बीसीसीआयने राखीव खेळाडूंमध्ये गिल आणि आवेश यांच्यासह खलील अहमद आणि रिंकु सिंग यांचाही समावेश आहे.

मात्र, सुपर-8 मधील काही सामने होईपर्यंत खलील आणि रिंकु भारतीय संघासह कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला सुपर-8 मधील सामना बार्बाडोस आणि अँटिग्वा येथे खेळायचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT