t20 world cup 2024 semi final sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्याच्या 1 दिवसआधी कर्णधार टेन्शनमध्ये! स्टार फलंदाज झाला जखमी

Rahmanullah Gurbaz Injury : अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध 8 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

Kiran Mahanavar

Rahmanullah Gurbaz Injury : अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध 8 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अफगाणिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण संघाचा स्टार फलंदाज रहमानउल्ला गुरबाज जखमी झाला आहे.

बांगलादेशच्या डावात गुरबाजला नवीन उल हकचा चेंडू गुडघ्याला लागला. त्यावेळी तो प्रचंड वेदनेत दिसला. यानंतर फिजिओ मैदानात आला आणि त्याच्या गुडघ्यावर स्प्रे मारवा, पण त्याचा त्रास कमी झाला नाही आणि त्याला मैदानात सोडावे लागले. त्याच्या जागी मोहम्मद इशाक यष्टिरक्षक म्हणून मैदानात उतरला. दुसऱ्या डावात त्याने यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारली.

रहमानउल्ला गुरबाज जखमी झाल्यास अफगाणिस्तानसाठी मोठा धक्का असेल. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने आतापर्यंत 7 डावात एकूण 281 धावा केल्या आहेत. त्याने तीन अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही.

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने त्याच्या दुखापतीबद्दल सांगितले की, त्याची दुखापत अधिक गंभीर आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे.

या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रहमानउल्ला गुरबाजने मोहम्मद शहजादचा विक्रम मोडला आहे. तो आता टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. गुरबाजने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 434 धावा केल्या आहेत. तर शहजादने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 402 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT