Virat Kohli | Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli: एकेकाळी खटके उडालेल्या खेळाडूची विराटबद्दल मोठी भविष्यवाणी, सांगितलं टी20 वर्ल्ड कपमध्ये कशी होईल कामगिरी

Steve Smith: विराट कोहलीची कामगिरी चालू टी20 वर्ल्ड कपमध्ये कशी होईल याबाबत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Pranali Kodre

Steve Smith on Virat Kohli: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध बुधवारी (5 जून) खेळायचा आहे. या सामन्यासह भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करतील.

दरम्यान, या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने मोठे अंदाज बांधले आहेत. त्याने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीबद्दलही मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

स्मिथने म्हटले आहे की टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा विराट कोहली करेल.

विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याचमुळे स्मिथने आयसीसीशी बोलताना म्हटले आहे की 'टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत माझ्या अंदाजानुसार सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली असेल. त्याने आयपीएल मध्येही चांगली कामगिरी केली आणि तो दमदार फॉर्ममध्येही आहे. मला वाटतेय तो सर्वाधिक धावा करेल.'

विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावाही केलेल्या. त्याने आयपीएल 2024 मध्ये 15 सामन्यांत 61.75 च्या सरासरीने आणि 155 च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 741 धावा केल्या होत्या.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विराट यापूर्वी 2014 आणि 2022 साली झालेल्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेतही सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

स्मिथने गोलंदाजीबद्दलही केली भविष्यवाणी

स्टीव्ह स्मिथने केवळ फलंदाजीच नाही, तर टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊ शकणाऱ्या गोलंदाजाबद्दलही अंदाज व्यक्त केला आहे. त्याच्या मते ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड सर्वाधिक विकेट्स घेऊ शकतो.

स्मिथ म्हणाला, 'माझ्या मते सर्वाधिक विकेट्स जोश हेजलवूड घेईल. मला वाटते येथील खेळपट्ट्या त्याच्या गोलंदाजीला फायदेशीर ठरतील, कारण तो चांगल्या लेंथसह गोलंदाजी करतो आणि खेळपट्टीवर चेंडू जोरात आपटतो.'

ऑस्ट्रेलियाचा टी20 वर्ल्ड कप 2024 मधील पहिला सामना 6 जून रोजी ओमान विरुद्ध बार्बाडोसला खेळायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT