India vs Afghanistan T20 World Cup 2024 Super 8  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs AFG : सुपर-8च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये मोठा बदल... 'या' स्टार खेळाडूची होणार एंट्री?

India vs Afghanistan Combination : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 मध्ये टीम इंडिया पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाचा हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे असेल.

Kiran Mahanavar

India vs Afghanistan T20 World Cup 2024 Super 8 : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 मध्ये टीम इंडिया पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाचा हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे असेल. त्यामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजी कॉम्बिनेशनमध्ये बदल दिसू शकतात. मोहम्मद सिराजला बाहेर ठेवून कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते.

न्यूयॉर्कमध्ये कुलदीप यादवला अद्याप एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, आता टीम इंडियाला वेस्ट इंडिजमध्ये सामने खेळायचे आहेत. त्यांचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध बार्बाडोस येथे होणार आहे.

कॅरेबियन भूमीवर फिरकीपटूंना खूप मदत मिळते आणि त्यामुळेच भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. असे झाल्यास कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.

मोहम्मद सिराजचा पत्ता कट?

कुलदीप यादवला खेळवल्यास मोहम्मद सिराजला वगळले जाऊ शकते. सिराजची आतापर्यंतची कामगिरी काही विशेष राहिली नाही. त्याला 3 सामन्यांत फक्त एकच विकेट घेता आली आहे आणि त्यामुळेच त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी कुलदीप यादवचा समावेश केला जाऊ शकतो. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह चांगली गोलंदाजी करत आहेत.

टीम इंडिया सुपर-8 मध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशशी मुकाबला करणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला किमान दोन सामने जिंकावे लागतील आणि आपला नेट रन रेटही चांगला ठेवावा लागेल.

गटातील अव्वल 2 संघच उपांत्य फेरीत जातील. टीम इंडियाला अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाकडून कडवी टक्कर द्यावी लागू शकते. याशिवाय बांगलादेशला पण हलक्यात घेणे ही मोठी चूक ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT