T20 World Cup 2024 Super-8 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 Super-8 : वर्ल्ड कपधून 1 टीम बाहेर; चॅम्पियन्स इंग्लंड, पाकिस्तानसह 'या' 10 संघांवर आता टांगती तलवार

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 21 सामने खेळले गेले आहेत, आणि आतापर्यंत एक संघ सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. तर 10 संघ आता सुपर-8 शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. यावेळी वर्ल्ड कपमध्ये 20 संघ खेळत आहेत. त्याचबरोबर सुपर-8 सामन्यांपूर्वी अनेक छोट्या संघांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 21 सामने खेळले गेले आहेत. यानंतर एक संघ सुपर-8 शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर आता चॅम्पियन्स इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तानसह 10 संघ बाहेर पडण्याचा धोका आहे.

ओमान सुपर-8 मधून बाहेर

ओमानचा संघही या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच खेळत होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघांसह ओमानला ब गटात ठेवण्यात आले होते. ओमानने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ओमान सुपर-८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

चॅम्पियन्स इंग्लंड, पाकिस्तानसह 'या' 10 संघांवर आता टांगती तलवार

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाऊस अनेक संघांसाठी खलनायक ठरला आहे. ज्यामध्ये पहिले नाव इंग्लंडचे आहे. इंग्लंडचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर इंग्लंड पुढचा सामना ऑस्ट्रेलियाकडून हरला. आता गतविजेत्याला सुपर-8 शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे. इंग्लंडने 2 सामने खेळले असून ते ब गटात एका गुणासह चौथ्या स्थानावर आहे.

इंग्लंडशिवाय दुसरे मोठे नाव न्यूझीलंडचे आहे. मात्र, आतापर्यंत या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने केवळ एकच सामना खेळला असून पहिल्याच सामन्यात संघाला अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. क गटात किवी संघ शेवटच्या स्थानावर आहे.

तिसरे मोठे नाव पाकिस्तानचे आहे. पाकिस्तान संघाने दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या पाकिस्तान अ गटात चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय युगांडा, नामिबिया, नेपाळ, आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, श्रीलंका आणि कॅनडा या संघांनाही सुपर-8 शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

ढिंग टांग : जल बिन मछली, नृत्य बिन बिजली..!

वेट ट्रेनिंगकडे दुर्लक्ष नकोच

दृष्टिकोनातील बदलाचा प्रवास

लवचीक व्यक्तिमत्त्व

SCROLL FOR NEXT