T20 World Cup 2024 Super 8 Qualification Scenario Group A points table sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 Super 8 : टीम इंडियाच्या विजयाने बदलले 'ग्रुप A' समीकरण; पाकिस्तानच्या आशा जिवंत तर...

T20 World Cup 2024 Super 8 Qualification Scenario : टीम इंडियाने बुधवारी यूएसए विरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कप सामन्यात 7 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Super 8 Qualification Scenario : टीम इंडियाने बुधवारी यूएसए विरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कप सामन्यात 7 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतासमोर यूएसए संघाने 111 धावांचे आव्हान ठेवले होते.

मात्र, अवघड खेळपट्टीवर टीम इंडियाने 18.2 षटकांत विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाने सुपर-8 चे तिकीट बुक केले आहे. भारताच्या या विजयानंतर पॉइंट टेबल आणि सुपर-8 चे समीकरणही बदलले आहे.

टीम इंडिया 6 गुणांसह आणि +1.137 च्या नेट रन रेटने 3 सामन्यांत सलग विजय नोंदवून सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. पण 15 जून रोजी भारताचा आयर्लंडविरुद्ध सामना होणार असला तरी, टीम इंडियाला पॉइंट टेबलच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

तर USA संघ आता 3 पैकी 2 सामने जिंकून 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे 4 गुण आणि नेट रेट नेट +0.127 आहे. आता जर यूएसएला सुपर-8 साठी पात्र ठरायचे असेल तर त्याला आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकावा लागेल.

पाकिस्तानच्या आशा जिवंत...

टीम इंडियाच्या या विजयानंतर पाकिस्तानच्या आशा जिवंत आहे. पाकिस्तान संघ भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होता. आता पाकिस्तानला सुपर-8 साठी पात्र ठरायचे असेल तर आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात यूएसए हरेल अशी प्रार्थना करावी लागेल. कारण त्यामुळे अमेरिकेचे केवळ 4 गुण राहतील. त्यानंतर 16 जून रोजी पाकिस्तानला आयर्लंडला चांगल्या फरकाने पराभूत करावे लागेल. तरच चांगल्या नेट रन रेटने सुपर-8 साठी पात्र ठरणारा दुसरा संघ बनू शकेल. अमेरिकेने पुढचा सामना जिंकला तर पाकिस्तानचे स्वप्न भंगले जाईल आणि ते वर्ल्ड कपमधून बाहेर पडेल.

कॅनडा आणि आयर्लंड कसे पात्र होतील?

आता असे म्हणता येईल की कॅनडा आणि आयर्लंड देखील अजून शर्यतीत आहेत. कॅनडाचे 3 सामन्यांतून 2 गुण आहेत आणि नेट रन रेट -0.493 आहे. कॅनडाला पात्र ठरायचे असेल तर भारताला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. तरच त्यांचा नेट रनरेट चांगला होऊ शकतो.

आता आयर्लंडचे 2 सामन्यांनंतर 0 गुण आहेत. पात्र ठरण्यासाठी आयर्लंडलाही दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. हे सामने पाकिस्तान आणि अमेरिका या संघांविरुद्ध आहेत. अशा परिस्थितीत त्यांना पात्र होण कठीण दिसत आहे. एकूणच सुपर-8 चे गणित गुंतागुंतीचे झाले आहे. अन्य कोणता संघ सुपर-8 साठी पात्र ठरतो हे पाहणे रंजक ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT